ना.रोडला धनगर समाज बांधवांचा आरक्षण अंमलबजावणी साठी रस्ता रोको
नाशिक :- सोमवार दिनांक २३सप्टेंबर रोजी दत्त मंदिर,नाशिक पुणे महामार्गावर सकल धनगर समाजाच्या वतीने अनु.जमाती आरक्षण अंमलबजावणी प्रकरणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यामुळे नाशिक पुणे मार्गावरील वाहतूक काही कालावधी करीता विस्कळित झाली होती.यावेळी धनगर समाज प्रतिनिधी समाधान बागल यांनी सांगितले की धनगर समाज हा मुळातच आदिवासी यादी मध्ये ३६ क्रमांकावर असून फक्त उच्चारणात व लिहिण्यात बरोडाचे बडोदा व्हावे असे धनगरांचे धनगड झाले आहे.शासनाला ही चुक दुरुस्ती करून फक्त आदेश काढायचा आहे. सदर आरक्षण अंमलबजावणी मुळे आदिवासी आरक्षणावर कुठलाही परीणाम होणार नसल्याचे धनगर समाजाचे म्हणणे आहे. नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग जवळपास एक तास रोखून धरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.याप्रसंगी महसूल विभागाचे अधिकारी,पोलीस अधिकारी,पोलीस फाटा तैनात होता. याप्रसंगी सामाजिकक्षेत्रातील भाऊलाल तांबडे, खंडेराव पाटील,समाधान बागल, विनायक काळदाते, ज्ञानेश्वर ढेपले, नवनाथ ढगे, सदाशिव वाघ, किशोर वाघ, नितीन धानापुणे राजाभाऊ पोथरे, सोमनाथ गायकवाड,कल्पेश शिंदे वैभव रोकडे, अण्णा साहेब सापणार देवराम रोकडे, राजाभाऊ बादाड, भूषण जाधव, बापूसाहेब शिंदे,,रामेश्वर खानपाटे, आदींसह आंदोलन प्रसंगी असंख्य धनगर समाज बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment