आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी 'एक पेड माँ के नाम' अभियानाअंतर्गत आवळ्याचे झाड लावले

'एक पेड माँ के नाम' अभियानांतर्गत औषधी वनस्पती लावण्याचे आयुष मंत्र्यांचे आवाहन
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक पेड माँ के नाम' या राष्ट्रीय मोहिमेचा एक भाग म्हणून, केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज आयुष भवन, नवी दिल्ली येथे त्यांच्या आई सिंधुताई गणपतराव जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'आवळ्याचे ' झाड लावले.

पत्रकारांना संबोधित करताना मंत्री म्हणाले की, 'एक पेड माँ के नाम' अभियान हे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या अभियानाच्या माध्यमातून लोकांना आईप्रती प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते. हे अभियान माता आणि मातृभूमीप्रति आदर व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. या अभियानात सहभागी होऊन, लोकांना आईसाठी आणि मातृभूमीसाठी काहीतरी विशेष केल्याचे समाधान मिळेल.

या अभियानाचा एक भाग म्हणून त्यांनी देशभरातील लोकांना आपापल्या परिसरात औषधी वनस्पती लावण्याचे आणि 'सेल्फी' घेण्याचे तसेच सोशल मीडियावर ते सामायिक करण्याचे आवाहन केले. यामुळे इतरांनाही या अभियानाचा भाग बनण्याची प्रेरणा मिळेल.

प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, 5 जून 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले #एक_पेड़_माँ_के_नाम #प्लांट4मदर हे अभियान आपल्या पर्यावरणाचे संरक्षण आणि शाश्वत विकासाप्रति जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक चळवळीचे स्वरूप घेत आहे.

यावेळी आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेश दधिची आणि मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाची या अभियानात प्रमुख भूमिका आहे. त्यांनी या अभियानासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी काही सहज उपलब्ध असलेल्या औषधी वनस्पतींची नावेही प्रसिद्ध केली आहेत. वृक्षारोपणाबरोबरच औषधी वनस्पतींबाबतही लोकांना जागरूक करणारा आयुष मंत्रालयाचा हा विशेष उपक्रम असून, पंतप्रधानांच्या संकल्पाला आरोग्याशीही जोडणारा आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला