उपशिक्षक जयवंत ठाकरे यांचा मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते सत्कार
नाशिक :- रयत शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा "यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार" व संस्थेच्या लाईफ वर्करपदी निवड झाल्याबद्दल बागलाण तालुक्यातील आसखेडा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील उपशिक्षक जयवंत निंबाजी ठाकरे यांना नुकताच सातारा येथे संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक या संस्थेचे सरचिटणीस मा. श्री. ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते जयवंत ठाकरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment