लासलगाव महाविद्यालयात श्री चक्रधर स्वामी जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा
लासलगाव :- येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आज दिनांक ५ सप्टेंबर रोजी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या दि. १८ जानेवारी २०२४ चे परिपत्रकानुसार महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी अवतारदिन जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्राध्यापक किशोर गोसावी तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे पर्यवेक्षक उज्वल शेलार, दीपाली कुलकर्णी, जितेंद्र देवरे, सुनिल गायकर, हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री चक्रधर स्वामी आणि डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व उपस्थित शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना अनमोल व सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment