नागरिकत्व (सुधारणा) कायदा, 2024 अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पश्चिम बंगालमध्ये सुरू


नवी दिल्ली :- हरियाणा आणि उत्तराखंडच्या अधिकारप्राप्त समित्यांनीही आज आपापल्या राज्यांमधील अर्जदारांच्या पहिल्या संचाला नागरिकत्व केले बहाल
नागरिकत्व (सुधारणा) कायदा, 2024 अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया आता पश्चिम बंगालमध्ये सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये आज राज्यभरातून आलेल्या अर्जांच्या पहिल्या संचाला अधिकार प्राप्त समितीने नागरिकत्व बहाल केले.

त्याचप्रमाणे, हरियाणा आणि उत्तराखंड राज्यांच्या अधिकारप्राप्त समित्यांनी देखील आज नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2024 अंतर्गत त्यांच्या संबंधित राज्यांतील अर्जदारांच्या पहिल्या संचाला नागरिकत्व बहाल केले आहे.

नागरिकत्व (सुधारणा) कायदा, 2024 च्या अधिसूचनेनंतर नागरिकत्व प्रमाणपत्रांचा पहिला संच दिल्लीतील अधिकार प्राप्त समितीने मंजूर केला आणि 15 मे 2024 रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह सचिवांनी अर्जदारांना सुपूर्द केला.

भारत सरकारने 11 मार्च 2024 रोजी नागरिकत्व (सुधारणा) कायदा, 2024 अधिसूचित केला होता.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन