इंदिरानगरला वाहतुकीचे नियम पाळा,अपघात टाळा या सदराखाली देखावा


इंदिरानगर - येथील विस्टा फेज 2 सोसायटीतील गणपती समोर पर्यावरण पूरक वाहतूक नियमां बद्दलचे आरास देखावा साकारला आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे रस्ता सुरक्षा हे एक मोठे आव्हान बनले आहे. अपघात आणि वाहतूक कोंडी हे मुख्यतःशिस्तीचा अभाव आणि वाहतूक नियमांबद्दलचे अज्ञानामुळे निर्माण होतात.


कर्णकर्कश्य हॉर्न,सायलेन्सर वाहनांचे आवाज,वेगाने वाहन चालवणे आणि त्यामुळे होणारे अपघात.याचे मुख्य कारण म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे. "फेरारी की सवारी" या चित्रपटातील संवादातून एक चांगली शिकवण मिळते. "जो देखेगा,वही सीखेगा". म्हणूनच बालवयात मुलांना वाहतुकीबाबत माहिती दिल्यास चांगले नागरिक घडवू शकतो.भावी पिढी मध्ये रहदारी व वाहतुकीच्या नियमांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणण्यासाठी, बालकांमध्ये वाहतूक नियम पाळण्या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा चिन्हांची माहिती मिळवण्यासाठी "वाहतुकीचे नियम पाळा,अपघात टाळा" या सदराखाली देखावा साकारला आहे.आरास ही पर्यावरणपूरक आहे,ज्यात कागदी पृष्ठे,आईस्क्रीमच्या काड्या,ओढण्या,कागदी प्रतिकृती इत्यादींचा वापर केला आहे.वाहतूक नियम पाळून आणि हेल्मेट परिधान करून बाप्पा दुचाकीवरून स्वार होत आहेत अशी श्रींची मूर्ती शाडू मातीने घरीच साकारण्यातआली आहे. विविध रस्ते माहिती फलक, त्यांचे प्रकार या आरासात दाखवले आहेत.

मद्यपान करून वाहन चालवू नये या बाबत जनजागृती करण्या साठी मद्य बाटलीची प्रतिकृती दाखवून त्यातून मद्य रुपी पाणी पडताना दाखवले आहे.तसेच वेगावर नियंत्रण ठेवावे यासाठी स्पीडो मीटरची प्रतिकृतीही बनविण्यात आली आहे. बालगोपाळांना वाहन चालवण्याचा अनुभव मिळावा यासाठी बसची प्रतिकृती तयार केली आहे, ज्यात बसून सेल्फी काढू शकतात. आरास साकारण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला.यासाठी राहुल शिंपी,प्रिया शिंपी,संध्या शिंपी,सत्यजित शिंपी व संपूर्ण शिंपी परिवाराने अथक परिश्रम करून देखावा सादर केला आहे. दरवर्षी साकारलेल्या देखाव्यास नाशिक जिल्ह्या स्तरावर विविध बक्षीस पटकवली आहे.
अधिक माहिती साठी. राहुल जयवंतराव शिंपी
सॉफ्टवेअर इंजिनिअर,
7620521919

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला