नाशिक जिल्हा कॅालेज टिचर्स पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. वैशाली कोकाटे यांची निवड
नवनिर्वाचित अध्यक्षा प्रा.वैशाली कोकाटे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, मानद सचिव कैलास बोरस्ते यांच्या निवडीचे स्वागत करताना मान्यवर व पदाधिकारी
स्थापनेपासून प्रथमच मिळाला महिला अध्यक्ष
नाशिक : कॅालेज टिचर्सची अर्थवाहिनी असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील नामवंत अशा नाशिक जिल्हा कॅालेज टिचर्स पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. वैशाली रामहरी कोकाटे (आहेर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच महिला अध्यक्षाची निवड झाल्याने प्रा.वैशाली कोकाटे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पेठरोड येथील उपनिबंधक कार्यालयात दि.३० ॲागस्ट २०२४ रोजी निवड प्रक्रिया पार पडली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अधिकारी पोद्दार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.
यावेळी ज्ञानेश्वर पोपट सोनवणे,यांची उपाध्यक्षपदी तर कैलास बोरस्ते यांची मानद सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नाशिक जिल्हा कॅालेज टिचर्स पतसंस्थेचे कार्यक्षेत्र हे सर्व जिल्हाभर असून सभासद संख्या २१०० असून भागभांडवल ३१ कोटी ३० हजार तर एकुण ठेवी ३२ कोटी ७४ लाख ५० हजार रूपये तसेच कर्ज वाटप ६७ कोटी ९४ लाख इतके असून कर्ज मर्यादा ५० लाख रूपये इतकी आहे. कर्ज वितरण हे ७ टक्के व्याजदराने केले जाते. तसेच संस्थेची आकस्मिक कर्जमर्यादा ७५,००० रूपये असून प्रत्येक सभासदाचा २५ लाख रूपये विमा काढलेला आहे.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, शिक्षणाधिकारी डॉ. विलास देशमुख, डॉ. नितीन जाधव,डॉ. डी. डी. लोखंडे, डॉ.भास्कर ढोके, डॉ. अजित मोरे, प्रा. डी. डी.जाधव, कैलास शिंदे यांनी अभिनंदन केले.
आगामी कार्यकाळातदेखील असाच पारदर्शक व दैदिप्यमान कारभार करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा प्रा.वैशाली कोकाटे यांनी सांगितले.यावेळी संचालक पॅनलचे नेते प्रा.डॅा.विलास देशमुख, संचालक प्रा.आर.के.पाटील, प्रा.डॅा.महेश वाघ, संतोष मोगल, प्रा.अशोक बोडके, प्रा.राजेंद्र घोलप, प्रा.मोहन धारराव, बाळासाहेब टर्ले, डॅा.जितेंद्र कोडीलकर, प्रा.आशा कदम-पेंढारी, प्रा.आण्णा टर्ले, प्रा.अविनाश कदम, प्रा.नंदकुमार काळे, अशोक बाजारे, प्रा.राहुल सोनवणे, प्रा.विष्णुपंत सोनवणे, लक्ष्मीकांत कोकाटे, प्रा.किरण रेडगावकर, प्रा.मंगेश ठोंबरे, डॅा.ऋषिकेश आहेर, निशिकांत मोगल आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment