लासलगाव महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत विद्यार्थी संवाद कार्यशाळेचे आयोजन

लासलगाव :-  कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगाव व महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र विद्यार्थी तंत्र सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा आयोजित विद्यार्थी संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र समिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष श्री यशवंत शितोळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक वृत्ती निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमधून रोजगार देणारे हात निर्माण व्हावे व विविध स्पर्धा परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांनी करावी हा हेतू समोर ठेवून करिअर कट्ट्याची स्थापना केल्याचा हेतू विशद केला. तसेच महाविद्यालयातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करीअर कट्यांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. करियर कट्ट्याच्या माध्यमातून दररोज विद्यार्थ्यांना यू.पी.एस.सी, एम.पी.एस.सी, उद्योजकता व कौशल्यवर आधारित उपक्रम यासारख्या गोष्टीचे मार्गदर्शन केले जाते असे प्रतिपादन केले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अदिनाथ मोरे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून करिअर कट्टा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या हितासाठी व प्रगतीसाठी तयार केलेले व्यासपीठ आहे. त्यातून आपल्या सर्वांगीण विकासासाठी करिअर कट्टा दिशादर्शक ठरेल असे स्पष्ट केले.

या कार्यक्रमासाठी करिअर कट्टा जिल्हा समन्वयक डॉ. आर. डी. खुर्चे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ.संजय निकम उपस्थित होते.
या विद्यार्थी संवाद उपक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व करिअर कट्ट्याचे प्रमुख डॉ.सोमनाथ आरोटे यांनी करून उपक्रमाचा उद्देश प्रास्ताविकातून स्पष्ट केला व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसशास्त्र विभागाचे प्रा.किशोर अंकुळनेकर यांनी केले. तर आभार स्पर्धा परीक्षा विभाग सदस्य डॉ.मारोती कंधारे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा परीक्षा विभाग समन्वयक डॉ.सोमनाथ आरोटे, ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा.गुरुदेव गांगुर्डे तसेच नैनेश लासुरकर, बाबा हारळे व स्पर्धा परीक्षा विभागातील सर्व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन