मराठा हायस्कूलचा योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक
नाशिक : येथील मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल सत्काराप्रसंगी मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात, उपमुख्याध्यापक रंगनाथ उगले, पर्यवेक्षक राजेंद्र शेळके, शंकर कोतवाल व रामनाथ रायते आदी
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा विद्यालयात सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात, उपमुख्याध्यापक रंगनाथ उगले, पर्यवेक्षक राजेंद्र शेळके, शंकर कोतवाल व रामनाथ रायते उपस्थित होते. दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कॉलेज व योगिक सायन्स असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समाज दिन व राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्ताने शास्त्रोक्त योगासन स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेत मराठा हायस्कूलने सहभाग घेतला. या स्पर्धेत मराठा हायस्कूलचा मुलांचा सांघिक संघ प्रथम व मुलींचा सांघिक संघ प्रथम तर रिदमिक सांघिक संघाचा तृतीय क्रमांक आला. वैयक्तिक योगासन स्पर्धेत सोहम घोरपडे या विद्यार्थ्यांचा तृतीय क्रमांक आला. तसेच पन्नास वर्षावरील खुला पुरुष गटात क्रीडाशिक्षक हरिभाऊ डेर्ले यांचा प्रथम क्रमांक आला.
वैष्णवी गाजरे, जान्हवी भवर, हर्षली वाजे, आराध्या पेखळे, दिव्या जाधव, तन्वी आहेर, रोहन फुलमाळी, आयुष भवर, सोहम घोरपडे, समाधान शिंदे, साहिल मते या खेळाडूंनी सहभाग घेतला. सर्व खेळाडूंना हरिभाऊ डेर्ले,मंगला शिंदे,राजाराम पोटे,जयंत आहेर,सुहास खर्डे,अनिल उगले व सुयश कुंभार्डे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,अध्यक्ष डाॅ.सुनील ढिकले,सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, नाशिक शहर तालुका संचालक ॲड.लक्ष्मणराव लांडगे, नाशिक ग्रामीणचे तालुका संचालक रमेश पिंगळे, चांदवड तालुका संचालक डाॅ.सयाजीराव गायकवाड व सर्व संचालक मंडळ, मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ. भास्कर ढोके, शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ. अशोक पिंगळे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ. दौलत जाधव, शालेय समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य,पालक - शिक्षक संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य, मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात, उपमुख्याध्यापक रंगनाथ उगले, पर्यवेक्षक रामनाथ रायते, शंकर कोतवाल, राजेंद्र शेळके सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment