त्र्यंबकेश्वर येथे आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न
त्र्यंबकेश्वर :-दि.१९/९/२०२४ त्र्यंबकेश्वर येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर या महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नाशिक विभाग आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ मुले व मुली स्पर्धा संपन्न
याप्रसंगी स्पर्धेचे उद्घाटक मविप्र संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. सुनील ढिकले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पुरुषोत्तम कडलग सदस्य महाविद्यालयीन विकास समिती यांनी सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हिच्याकडून खेळाडूंनी स्फूर्ती व प्रोत्साहन घेऊन उत्कृष्ट खेळ खेळावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे व महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्ष माननीय मुरलीधर पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील 59 संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 87 मुली व 137 मुलांनी सहभाग नोंदवला.
Comments
Post a Comment