त्र्यंबकेश्वरला देवीदेवतांची चित्र रेखाटलेल्या जागी घाणीचे साम्राज्य,स्वच्छता करावी - समाधान बोडके पाटील
त्र्यंबकेश्वर :- श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शहराच्या सुरवातीलाच नगरपरिषदेने माझी वसुंधरा स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देवदेवतांचे ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजाच्या रेखाटलेल्या चित्राची अत्यंत दैनिय अवस्था असुन याठिकाणी घाणीचे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
चित्र रेखाटलेल्या त्या भिंतीवर अक्षरशः रात्रीच्या वेळेस लघुशंका केली जाते याठिकाणी नगरपरिषद कुठलीही साफसफाई स्वच्छता करत नाही.यामुळे सदर चित्रांची विटंबना होऊन हिंदुधर्मीयांच्या भावना दुखवल्या जात आहेत. याप्रकरणी
दुर्लक्ष करणारे नगरपरिषद कर्मचारी यांच्यावर शासनाने तात्काळ कारवाई करावी सदरच्या परिसरात स्वच्छता ठेवून पावित्र्य राखावे अशी मागणी प्रसिद्धी प्रमुख शी बोलताना शिवसेना त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख समाधान बोडकेपाटील यांनी केली आहे.
Comments
Post a Comment