धर्मवीर चित्रपटामुळे सामान्य माणसाची संघर्ष गाथा प्रेक्षकांसमोर आली - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २६: एका सामान्य माणसाचे नेतृत्व समाजाच्या कल्याणासाठी संघर्षातून उभे राहते. स्व. आनंद दिघे यांच्या प्रेरक जीवनावर आधारित धर्मवीर-२ या चित्रपटातून अशाच प्रकारे एका सामान्य माणसाच्या नेतृत्वाची संघर्ष गाथा प्रेक्षकांसमोर आली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

स्व. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर २ मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या प्रीमियर कार्यक्रमप्रसंगी आयनॉक्स चित्रपट गृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. चित्रपटाला शुभेच्छा देताना त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, स्व. आनंद दिघे यांच्या प्रेरक जीवन प्रवासातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व उभे राहिले आहे. एखाद्या चित्रपटातील चरित्र नायक काल्पनिक असू शकतात. पण आपण ज्यांना पाहिले, त्यांच्याबद्दल वाचले, एकले आहेत. असे चरित्र नायक ज्यावेळी पडद्यावर पाहायला मिळतात, त्यावेळी लोक त्यांच्याशी आपापल्या पद्धतीने जुळत जातात. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, तेव्हापासून प्रेक्षकांना चित्रपटाची उत्कंठा लागली होती. धर्मवीर-१ या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्याच पद्धतीने धर्मवीर-२ या चित्रपटालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार  चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला