आदिवासी विकास महामंडळ मर्यादित वसतिगृह इमारतीचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

नाशिक दि. 5 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, वसतिगृह इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या तर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या प्रसंगी वसतिगृह इमारतीचे फित कापून उद्घाटन केले.

आज शहरातील सिडको भागात वसतिगृह इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होत्या, तर शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील, एन.डी.गावित, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक तथा आमदार सुनील भुसारा, धनराज महाले, भरतसिंग दुधनाग, मगन वळवी, विकास वळवी, विठ्ठल देखमुख, मधुकर काठे, केवलराम काळे, अशोक मंगाम, प्रकाश दडमल, संचालिका ताराबाई माळेकर, जयश्री तळपे, मीनाक्षी वट्टी, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आपल्या मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी उभ्या केलेल्या वसतिगृहाच्या इमारतींचे काम कौतुकास्पद आहे. येथे वास्तव्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांनी अध्ययनासोबतच इमारतींचे सौंदर्य जतन केले पाहिजे. इमारतीच्या परिसरातील मोकळ्या जागेचा उपयोग हा पार्किंगसह विद्यार्थ्यांसाठी एकत्रितपणे सांस्कृतिक कार्यक्रम घेता येईल या दृष्टीने करता येईल. वसतिगृहातील विद्यार्थी ते वसतीगृहाचा उद्घाटक हा प्रवास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत यावेळी कथन केला.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती बनसोड म्हणाल्या की, आज या वसतिगृहाचा अतिशय सुंदर प्रकल्प पूर्ण झाल्याचा आंनद होत आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या वसतिगृह इमारतीत 100 ते 150 विद्यार्थ्यांची निवासाची सोय होणार आहे. येणाऱ्या काळातही महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या निवास व्यवस्था उभारल्या जातील असे त्यांनी योवळी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक तथा आमदार सुनिल भुसारा व मधुकर काठे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वजन करण्यात आले. त्यांनतर वसतिगृह इमारतीचे कोनशीलेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती शिरवाडकर यांनी केले, तर आभार प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला