महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज - ॲड. नितीन ठाकरे

जेआयसी ग्रेपसिटीतर्फे केटीएचएम महाविद्यालयात नारी सुरक्षा अभियान

नाशिक :- आजकाल महिलांवर जे काही अत्याचार होत आहेत, त्याविरोधात समाजातील सर्वच घटकांनी एकत्र यावे. प्रत्येक महिला ही आपली माता, भगिनी व मुलगी आहे, असेच समजून सर्व महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.
महिलांवरील अत्याचार रोखण्याकरिता जेआयसी ग्रेपसिटी यांच्या वतीने नाशिक शहरात नारी सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठा विद्या प्रसारक समाजाच्या गंगापूर रोड येथील केटीएचएम महाविद्यालयात आयोजित नारी सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 
यावेळी ॲड. ठाकरे म्हणाले, आजकाल समाजामध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांवरून समाजामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात चीड व संतापाची भावना निर्माण झालेली आहे. अशा प्रकारच्या घटनांवर नाराजी व्यक्त करीत ॲड. ठाकरे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व प्राध्यापक यांना अत्याचार रोखण्याची शपथ दिली.
प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी उपस्थिताचे स्वागत केले. याप्रसंगी जेसीआयचे अध्यक्ष अमित जैन, योगेश दुसाने, सोनाली दगडे-कासलीवाल, प्रा. अनिल भंडारे, प्रा. अजित रकिबे, प्रा. आर. एस. पवार, प्रा. पिंगळे आदींसह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगातील सर्वात मोठे स्वाक्षरी पुस्तक
या उपक्रमांतर्गत ६ बाय ८ आकाराचे भव्य असे स्वाक्षरी पुस्तक मांडण्यात आले होते. त्यावर ॲड. नितीन ठाकरे यांच्यासह हजारो विद्यार्थ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. जवळपास ५० हजारांच्यावर विद्यार्थी व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या भावनांचे प्रतीक म्हणून हे पुस्तक शासनापर्यंत पोचविण्यात येणार आहे. स्वाक्षरी पुस्तक हे जगातील सर्वात मोठे स्वाक्षरी पुस्तक म्हणून गणले जाणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला