मविप्रचा टेक महिंद्रा फाउंडेशन सोबत पुणे येथे सामंजस्य करार
मविप्र' नाशिकमध्ये सुरू करणार हेल्थ केअर ॲकेडमी
नाशिकमध्ये हेल्थ केअर ॲकेडमी सुरू करण्यासंदर्भातील सामंजस्य काराराप्रसंगी ॲड. नितीन ठाकरे, जया लुहाना, डॉ. एस.एस. काळे आदी
नाशिक : टेक महिंद्रा फाउंडेशन व मराठा विद्या प्रसारक समाज यांच्यामध्ये नुकताच एक सामंजस्य करार झाला असून, या माध्यमातून लवकरच नाशिकमध्ये हेल्थ केअर ॲकेडमी सुरू करण्यात येणार आहे.
दिवसेंदिवस वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन टेक महिंद्रा फाउंडेशन आणि मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक यांनी शनिवार दि. १४ सप्टेंबर रोजी पुणे येथे सामंजस्य करार केला. या कराराच्या अनुषंगाने दोन्ही संस्थांच्या वतीने पुढील 3 वर्षांसाठी नाशिक येथे
'SMARTH' ( Skills for Market Training in Health Care ) ही ॲकेडमी सुरु करण्यात येणार आहे. या करारावर स्वाक्षरी करतांना टेक महिंद्रा फाउंडेशनच्या प्रोजेक्ट मॅनेजर जया लुहाना व मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे उपस्थित होते.
नाशिकमध्ये वैदयकिय क्षेत्रामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ मिळण्यास या कराराचा फायदा होणार आहे. या ॲकेडमी अंतर्गत हेल्थकेअर या सेक्टरमधील जॉब रेडी कोर्सेसचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यातून युवक-युवतींना रोजगार तर मिळणार आहेच, शिवाय वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळण्यास मदत होणार आहे.
- ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र, नाशिक
Comments
Post a Comment