मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने दिल्लीत राजदूतांना गणेशमूर्ती आणि उकडीचे मोदक भेट

नवी दिल्लीतील विविध देशांच्या दूतावासांमध्ये चतुर्थीच्या पूर्वसंध्येला श्रीगणेशमूर्तीची स्थापना
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने नवी दिल्लीत विविध देशांच्या राजदूतांना गणेशोत्सवानिमित गणेशमूर्ती आणि उकडीचे मोदक भेट देण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे दिल्लीस्थित जनसंपर्क अधिकारी अभिषेक जाधव यांनी विविध देशांच्या दूतावासांना प्रतिकात्मक श्रीगणेशाची मूर्ती भेट दिली. अनेक देशाच्या राजदूतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे आभार मानले.

गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. विविध देशांचे सर्वोच्च प्रतिनिधी म्हणून सर्व देशांचे राजदूत नवी दिल्लीत कार्यरत असतात. गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे उकडीचे मोदक आणि श्रीगणेशाची मूर्ती भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने विविध देशांच्या राजदूतांना देण्यात आली. एकमेकांच्या संस्कृतीची देवाणघेवाण व्हावी, महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख साऱ्या जगाला व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.

डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वेन, मेक्सिकोचे राजदूत फेडेरिको सेलस, कुवेतचे राजदूत मेशाल मुस्तफा अलशेमाली, लॅटव्हियाचे राजदूत ज्युरीस बोन, लिथुआनियाच्या राजदूत डायना मिकेव्हीसीएनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राच्या जनतेप्रती व्हिडिओच्या माध्यमातून आभार मानले. तसेच अन्य सर्व राजदूतांनी आभार मानले.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे ठळकपणे प्रतिनिधित्व करणारा सण आहे. भारताला सार्वजनिक गणेशोत्सवाची देणगी महाराष्ट्राने दिली. देशाच्या स्वातंत्र्यालढ्यात तसेच जडणघडणीतही गणेशोत्सवाची भूमिका महत्वाची होती. महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक, उद्योग आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विविध देशाच्या राजदूतांना महाराष्ट्राच्या उत्साही आणि सकारात्मक उत्सवी संस्कृतीची ओळख व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. सर्व देशांच्या प्रतिनिधींनी अतिशय सकारात्मक भावना व्यक्त केल्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार मानले. तसेच महाराष्ट्राच्या तमाम जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला