राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी स्वच्छ वायु सर्वेक्षण पुरस्कार, 2024 केला प्रदान
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि
जयपुर :- केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांच्या उपस्थितीत दिनांक 07.09.24 रोजी जयपूर येथे ‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवा’ हा आंतरराष्ट्रीय दिवस अर्थात ‘स्वच्छ वायु दिवस’, साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राजस्थान सरकारचे वन, पर्यावरण आणि हवामान बदल राज्यमंत्री संजय शर्मा तसेच केंद्रीय नगरविकास आणि राजस्थान सरकारचे स्थानिक स्वराज्य मंत्री झबर सिंग खर्रा हे देखील उपस्थित होते. या दिनानिमित्त या वर्षीचा कार्यक्रम राजस्थान राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित केला होता.
विजेत्या शहरांचे अभिनंदन करून आणि राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमात (NCAP) सहभागी होण्यासाठी इतर शहरांना प्रोत्साहन देत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी बहु-हितसंबंधी भागीदारी, क्लीन एअर नाऊ मध्ये गुंतवणूक वाढवणे आणि वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आपल्या सामायिक जबाबदारीचा स्वीकार करणे या मुद्द्यांवर भर दिला. ‘निसर्ग आपल्याला त्याच्याकडील सर्वोत्तम देतो; त्या बदल्यात आपणही निसर्गाला आपले सर्वोत्तम द्यायला हवे’ याची यादव यांनी या कार्यक्रमातील उपस्थितांना आठवण करून दिली.
Comments
Post a Comment