रोटरी क्लब ऑफ मिड टाऊन नाशिक च्या वतीने शिक्षकांचा सन्मान
नाशिक :- शिक्षक दिनाच्या निमित्ताने,रोटरी क्लब ऑफ मिड टाऊन नाशिक च्या वतीने दिला जाणारा सन 2024चा "Nation Builder Award" आज दि. 4सप्टेंबर 2024 रोजी, शैक्षणिक क्षेत्रात पवित्र ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना प्रदान करण्यात आला. यात विविध संस्था अंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने आदिवासी बांधवांचे जीवन घडवणारी डांग सेवा मंडळ नाशिक या संस्थेतील आंबेगन आश्रम शाळेतील प्राथमिक मुख्याध्यापक राजेंद्र आहिरे, उंबरठाण आश्रमशाळेचे अधिक्षक माधव गायकवाड,व माध्यमिक विद्यालय बाऱ्हे येथील नितीन आहिरे, यांना वरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण आमच्या डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती हेमलताताई बिडकर व सचिव सौ मृणाल ताई जोशी तसेच रोटरी क्लब चे मा. जाधव साहेब, बेजोन देसाई पाऊंडेशन चे डॉ. भारद्वाज सर इ. मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी अन्य संस्थेत काम करणाऱ्या अनेक शिक्षकांचा गौरव करण्यात आला. शिक्षकांना प्रेरणादायी व त्यांच्या कला गुणांना दृढ करण्याचा प्रयत्न दरवर्षी रोटरी क्लब करत असते. सर्व सन्मानित शिक्षक व्यवसाय बंधूचे हार्दिक अभिनंदन.

Comments
Post a Comment