आपत्तीचे व्यवस्थापन करताना तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यावा - आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक येथे विभागस्तरीय आपत्ती व्यवस्थापन परिषद संपन्न
नाशिक, दि. 2 सप्टेंबर :- आपत्ती व्यवस्थापन करताना सूक्ष्म नियोजन अतिशय महत्वाचे आहे. हे नियोजन करतानाच उपलब्ध तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन नाशिक विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी येथे केले.
नैसर्गिक आपत्तीबाबत जनजागृतीसाठी आज सकाळी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरू दक्षिणा सभागृहात नाशिक विभागस्तरीय दक्ष आपत्ती व्यवस्थापन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिकेच्या अपर आयुक्त स्मिता झगडे, विभागीय उपायुक्त डॉ. राणी ताटे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, नंदुरबारचे निवासी उपजिल्हाधिकारी  भामरे आदी उपस्थित होते.

आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, कोणतीही आपत्ती सांगून येत नाही. मात्र, आपत्तीचे व्यवस्थापन केल्यास तीव्रता कमी होऊ शकते. आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी २००५ मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला. आपत्तीचे व्यवस्थापन करताना शिथिलता नको. सर्व विभागांनी समन्वय ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.
विशेष पोलिस महानिरीक्षक  कराळे म्हणाले की, आपत्तीच्या काळात आपण काय मदत करू शकतो याचा विचार केला पाहिजे. लहान- लहान घटनांतून अनुभव घेत नियोजन केले पाहिजे. एखादी घटना घडल्यावर नागरिकांनी संयम ठेवावा. तसेच प्रत्येक विभागाने आपापली भूमिका बजावावी, असेही त्यांनी सांगितले.
यशदा चे माजी संचालक कर्नल विश्वास सुपनेकर यांचे गर्दी व्यवस्थापन, नाशिक कुंभमेळा 2027 च्या अनुषंगाने तयारी व सज्जता, ‘दिश’ च्या सहसंचालक अंजली आढे यांनी औद्योगिक सुरक्षा व सीबीआरएन, मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन सल्लागार प्रशांत वाघमारे यांनी आगामी कुंभमेळा व आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र पोलिस अकादमीचे सहसंचालक संजय साळुंखे यांनी कुंभमेळा व आपत्ती व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी नाशिक विभागातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला