Posts

राज्यस्तरीय धनगर साहित्य संमेलनात समाधान बागल यांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव

Image
सोलापूर:-  बेलाटी इथे राज्यस्तरीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन मध्ये नाशिक जिल्ह्याचे समाज भूषण प्रहार सरचिटणीस समाधान बागल यांना समाजरत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. नाशिक मधील होळकर शाळेचा विकास सर्व समाजात प्रचार प्रसार करण्यात, तसेच अहिल्यादेवी होळकरांनी जे कार्य केले आहे त्याची प्रशासनाशी दखल घेऊन त्या ठिकाणी मा अहिल्यादेवीची कार्याचा गजर करणे. दिव्यांग शेतकरी, दुर्बल घटकातील समाजातील लोकांसाठी धावून जाणे, दुर्लक्षित होळकर शाही वास्तूंकडे प्रशासनाचे लक्ष केंद्रित करणे. या बहुमूल्य उपक्रमांसाठी सोलापूर बिलाटी येथे झालेल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलन मध्ये मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आली. याप्रसंगी समाधान बागल यांनी हा पुरस्कार समाजाला समर्पित केला. याप्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस, माजी आमदार रामहरी रुपनवर, डॉक्टर अभिमन्यू टकले, श्रीराम पाटील, बाळासाहेब कर्णवर, प्राचार्य चोपडे, संभाजी सूळ, विनायक कळदाते, ज्ञानेश्वर ढेपले,आदी मान्यवर उपस्थित होते.

व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बांबू कंट्रक्शन कोर्स महत्वपूर्ण - बाळासाहेब क्षिररसागर

Image
नाशिक :- बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, चंद्रपूर, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नाशिक व मराठा विद्या प्रसारक समाज संचलित, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार,नवी दिल्ली जन शिक्षण संस्थान नाशिक व शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बांबू कंट्रक्शन व आर्किटेक्चर प्रॅक्टिसेस ट्रेनिंग कोर्स च्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी जन शिक्षण संस्था चेअरमन बाळासाहेब क्षीरसागर , IIA नासिक चे अध्यक्ष श्री रोहन जाधव , संकेत ढिकले ,सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास विभाग अनिसा तडवी , जन शिक्षण संस्थांन नाशिक संचालिका सौ.ज्योती लांडगे , आर्किटेक्चर कॉलेज प्राचार्या सौ.प्राजक्ता बस्ते ,बांबू प्रशिक्षक श्री. संदीप गडेकर इत्यादी मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.प्रास्ताविकात ज्योती लांडगे यांनी सांगितले की बांबू कंट्रक्शन हा प्रोजेक्ट बीआरटीसी चंद्रपूर मार्फत राबविला जाणार आहे प्रथमच हा प्रोजेक्ट नाशिकमध्ये होत आहे. बांबू प्रशिक्षक संदीप गाडेकर यांनी बांबू कंट्रक्शन कोर्स बद्दल माहिती दिली.  अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब क्षिरसागर यांन...

मखमलाबाद विद्यालयात इ.१० वीच्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद व शुभेच्छा समारंभ संपन्न

Image
फोटो - इ.१० वीच्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद व शुभेच्छा कार्यक्रम प्रसंगी मविप्र संचालक रमेश पिंगळे,माजी नगरसेवक दामोदर मानकर,माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,पर्यवेक्षिका माधुरी थेटे,शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे इ.१० वीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद व शुभेच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.मविप्र संचालक रमेश पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली,माजी नगरसेवक दामोदर मानकर यांच्या अध्यक्षतेखाली व मराठा हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत शिवप्रतिमापुजन व सरस्वतीपुजन करण्यात आले.संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या गीतमंचातर्फे स्वागत गीत सादर करण्यात आले.प्रास्ताविक शालेय उपपंतप्रधान कु.गौतमी देशमुख हिने केले.तिने कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.उपस्थित सर्व मान्यवरांचे प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभह...

मखमलाबाद विद्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती व कर्मवीर अॅड.बाबुराव ठाकरे पुण्यतिथी साजरी

Image
फोटो - राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती व कर्मवीर बाबुराव ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापुजन करतांना प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,पर्यवेक्षिका माधुरी थेटे,शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर अॅड.बाबुराव गणपतराव ठाकरे यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपिठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे,पर्यवेक्षिका माधुरी थेटे,जेष्ठ शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.कु.अथर्व थोरवत याने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवनकार्याविषयी सखोल माहिती दिली.गाडगे महाराज यांनी आपले संपूर्ण जीवन समाज कार्यासाठी वाहुन घेतले होते.त्यांनी गावोगावी भजन,किर्तन करुन समाजप्रबोधनाचे महान कार्य केले.खेड्यापाड्यात जाऊन रस्ते व गावे स्वच्छ करुन स्वच्छतेचा मंत्र दिला.कु....

तपोवन मंडल भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन

Image
नाशिक :- अमृतधाम चौफुली येथे मागील हफ्त्याभरात दोन दुर्दैवी अपघाती घटना घडल्या त्यातील एका घटनेत विनिता कुयते नावाच्या एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला.या घटना वारंवार घडत असल्याने ही गोष्ट आणि त्यावर असणाऱ्या उपाययोजना प्रशासनाच्या कानावर घालण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा तपोवन मंडल च्या वतीने  पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये अमृतधाम चौफुली येथे सिग्नल बसविणे व अतिक्रम हटवणे तसेच वाहतूक नियंत्रणात आणणे या मागण्या करण्यात आल्या आहेत. तपोवन मंडलाच्या युवा मोर्च्याच्या निवेदन पत्राची  पोलीस आयुक्तांकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली व त्यावर लवकरच कार्यवाही करून परिस्थिती नियंत्रणात आणू असे आश्वासन देखील तपोवन मंडलाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.सिग्नल यंत्रणा जो पर्यंत  बसवण्यात येत नाही तोपर्यंत प्रशासनाकडून तिथे वाहतूक पोलिसांना नियंत्रणासाठी पाठवण्यात येईल व तेथील यंत्रणा राबवण्यासाठी ते स्वतः व्यक्तिक लक्ष घालतील असे देखील आयुक्तांकडून सांगण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा तपोवन मंडलाचे अध्यक्ष अविनाश...