व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बांबू कंट्रक्शन कोर्स महत्वपूर्ण - बाळासाहेब क्षिररसागर
नाशिक :- बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, चंद्रपूर, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नाशिक व मराठा विद्या प्रसारक समाज संचलित, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार,नवी दिल्ली जन शिक्षण संस्थान नाशिक व शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नाशिक
यांच्या संयुक्त विद्यमाने बांबू कंट्रक्शन व आर्किटेक्चर प्रॅक्टिसेस ट्रेनिंग कोर्स च्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी जन शिक्षण संस्था चेअरमन बाळासाहेब क्षीरसागर , IIA नासिक चे अध्यक्ष श्री रोहन जाधव , संकेत ढिकले ,सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास विभाग अनिसा तडवी , जन शिक्षण संस्थांन नाशिक संचालिका सौ.ज्योती लांडगे , आर्किटेक्चर कॉलेज प्राचार्या सौ.प्राजक्ता बस्ते ,बांबू प्रशिक्षक श्री. संदीप गडेकर इत्यादी मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.प्रास्ताविकात ज्योती लांडगे यांनी सांगितले की बांबू कंट्रक्शन हा प्रोजेक्ट बीआरटीसी चंद्रपूर मार्फत राबविला जाणार आहे प्रथमच हा प्रोजेक्ट नाशिकमध्ये होत आहे. बांबू प्रशिक्षक संदीप गाडेकर यांनी बांबू कंट्रक्शन कोर्स बद्दल माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब क्षिरसागर यांनी सांगितले की ' बांबू कन्ट्रक्शन हा कोर्स आर्किटेक्चर विद्यार्थ्यांसाठी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा कोर्स असून, लाकडाच्या ऐवजी बांबूचा प्रत्यक्ष उपयोग करण्यात येईल.आर्किटेक्चर झाल्यानंतर पुढे त्यांना या कोर्सचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होईल. असे प्रशिक्षण महाराष्ट्रात पहिल्यांदा होत आहे. आर्किटेक्चर कॉलेज मधील ५० विद्यार्थ्यांनी ह्या कोर्समध्ये प्रशिक्षणासाठी सहभाग घेतला असून दररोज नऊ ते पाच या वेळेत आठ दिवस हे प्रशिक्षण सुरू असेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जन शिक्षण संस्थेचे कार्यक्रम समन्वयक संदीप शिंदे यांनी तर आभार आर्किटेक्चर कॉलेजच्या प्राचार्य प्राजक्ता बस्ते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मविप्रचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांनी प्रोत्साहन दिले. कार्यक्रम यशस्वतेसाठी जन शिक्षण संस्थानचे दत्तात्रय भोकनळ, आर्किटेक्चर कॉलेजचे प्रा.उमेश हिरवे, प्रा.शितल प्रा.आहिरे यांनी प्रयत्न केले.
Comments
Post a Comment