इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगर येथे जोड रस्ता कामाचं भुमीपुजन
इगतपुरी :- कृष्णनगर ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित रस्ता अखेर मार्गी
ग्रामपंचायत कृष्णनगर हद्दीतील गेली दहा वर्षांपासून रखडलेला कातोरेवाडी ते धोंगडेवाडी वार्ड क्रमांक 02 व 03 यांना जोडणारा रस्ता अखेर नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांच्या पाठपुराव्याने मंजूर नवनिर्वाचित उपसरपंच गणेश दत्तू धोंगडे, यांच्या हाताने श्रीफळ वाढवून कामास सुरुवात करण्यात आली उपस्थित मान्यवर सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, शिपाई, ठेकेदार संदीप शिरसाट, व ग्रामस्थ
ग्रामपंचायत हद्दीतील तसेच इतर दहा गावांना जोडणारा रस्ता अखेर मार्गी लागल्याने परिसरात समाधानाचे वातावरण असून ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment