मनपा क्षेत्रातील शाळांमध्ये पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती ( ८ वी ) परिक्षेचे आयोजन



नाशिक :- नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षाचे ( ८ वी ) आयोजन करण्यात आलेले आहेत. सदर परिक्षेसाठी इयत्ता ५ वीसाठी ३७ तर इयत्ता ८ वीसाठी ३२ अशा एकूण ६९ केंद्रावर परीक्षा होणार आहे. या शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये इयत्ता ५ वीचे एकूण ७९५३ तर इयत्ता ८ वीचे ६४८२ असे एकूण १४४३५ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. नाशिक शहरातील सर्व एकूण ६९ केंद्रासाठी राखीव सहित ७३ केंद्रसंचलाकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती ( ८ वी ) परिक्षेचे नियोजन श्री. बी. टी. पाटील शिक्षणाधिकारी मनपा शिक्षण विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी