मखमलाबाद ज्युनिअर काॅलेजचे मविप्र युवास्पंदनच्या विविध स्पर्धांमध्ये उत्तुंग यश

फोटो - मविप्र युवास्पंदन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,ज्युनिअर विभाग प्रमुख उज्वला देशमुख,सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.टी.लवांड व जेष्ठ शिक्षकवंद
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचेश्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथील ज्युनिअर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी ओझर केंद्रावर पार पडलेल्या मविप्र युवास्पंदन अंतर्गत विविध स्पर्धांमध्ये उत्तुंग यश मिळविले.जुनिअर कॉलेज विभागातील अनेक विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला होता.यामध्ये खालील कलाप्रकारांमध्ये स्पर्धकांनी उत्तुंग यश मिळविले.
कु.प्रेमकुमार भुसारे (इ.11वी वाणिज्य) भारतीय शास्त्रीय स्वरवादन स्पर्धा (हार्मोनियम) - प्रथम क्रमांक
कु.अंजली जाधव (इ.11वी वाणिज्य) मेहंदी स्पर्धा - प्रथम क्रमांक
कु.वैष्णवी कातड,कु.कल्पना थोरात,कु.वैष्णवी कातड,कु.ज्योती पिंगळे,कु.भावना पिंगळे,कु.शितल खताळे,कु.दिपिका नामाडे,कु.अश्विनी मानकर,कु.दिपाली इंगळे (इ.11वी वाणिज्य) मूकनाट्य स्पर्धा - द्वितीय क्रमांक
कु. स्वाती पाटील (इ.12वी विज्ञान) रांगोळी स्पर्धा - द्वितीय क्रमांक
कु.हर्षल जाधव (इ.12 वी विज्ञान) पोस्टर/ चित्रकला स्पर्धा - तृतीय क्रमांक
अरमान पठाण (इ.11वी विज्ञान) फोटोग्राफी स्पर्धा - तृतीय क्रमांक
कु.वृषाली दोबाडे,कु.तृप्ती वायचळे,कु.पायल आंबेकर,कु.स्वाती बेंडकोळी,कु.कल्याणी सुर्यवंशी,कु.अपेक्षा जाधव,कु.धनश्री वाघ (इ.12वी वाणिज्य) समूहगीत गायन स्पर्धा - तृतीय क्रमांक
अशापध्दतीने विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून ज्युनिअर कॉलेजच्या नावलौकिकात भर घातली.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ज्युनियर काॅलेजच्या विभाग प्रमुख उज्वला देशमुख,सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.टी.लवांड व काॅलेजच्या सर्व शिक्षकांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.
*यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र संचालक रमेश पिंगळे,मविप्र शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ.भास्करराव ढोके,शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ.अशोकराव पिंगळे,उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष पंढरीनाथ पिंगळे,अभिनव शालेय समिती अध्यक्ष निवृत्ती महाले,कला व वाणिज्य महाविद्यालय समिती अध्यक्ष सुरेश पिंगळे,होरायझन स्कुल कमिटी अध्यक्ष शंकरराव पिंगळे,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दिनकरराव पिंगळे,सर्व स्कुल कमिटी सदस्य,सभासद,ग्रामस्थ,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे, पर्यवेक्षिका माधुरी थेटे,ज्युनिअर विभाग प्रमुख उज्वला देशमुख,सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.टी.लवांड,सर्व माध्यमिक व ज्युनिअर काॅलेजचे शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला