मखमलाबाद विद्यालयात इ.१० वीच्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद व शुभेच्छा समारंभ संपन्न
फोटो - इ.१० वीच्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद व शुभेच्छा कार्यक्रम प्रसंगी मविप्र संचालक रमेश पिंगळे,माजी नगरसेवक दामोदर मानकर,माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,पर्यवेक्षिका माधुरी थेटे,शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे इ.१० वीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद व शुभेच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.मविप्र संचालक रमेश पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली,माजी नगरसेवक दामोदर मानकर यांच्या अध्यक्षतेखाली व मराठा हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत शिवप्रतिमापुजन व सरस्वतीपुजन करण्यात आले.संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या गीतमंचातर्फे स्वागत गीत सादर करण्यात आले.प्रास्ताविक शालेय उपपंतप्रधान कु.गौतमी देशमुख हिने केले.तिने कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.उपस्थित सर्व मान्यवरांचे प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते पुस्तक व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.इ.१० वीच्या विद्यार्थ्यांतर्फे सर्व वर्गशिक्षक व विषयशिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.इ.१० वीचे विद्यार्थी कु.सांजली पवार,कु.सिध्दी ढगे,कु.सोहम शिरसाठ,कु.श्रृती कोतकर,कु.कौस्तुभ नाठे या सर्व विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.त्यांनी शाळेतील विविध अनुभव तसेच शाळेतील शिक्षकांच्या प्रती आपले मनोगत व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले.जेष्ठ शिक्षिका रुपाली शिंदे व संतोष उशीर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेस कशाप्रकारे सामोरे जावे,पेपर कसे सोडवावे याविषयी मार्गदर्शन केले व सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.मविप्र संचालक रमेश पिंगळे यांनी इ.१० वीच्या विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.दिनांक १ मार्चपासुन सुरु होणार्या बोर्डाच्या परीक्षेसाठी व भावी आयुष्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात अतिशय बारीक बारीक गोष्टींचे बहुमोल असे मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे विषयावार नियोजन कसे करावे,पेपरचे लिखाण योग्य वेळेत कसे पूर्ण करावे.पेपर सोडविण्याची योग्य पध्दत,मनामध्ये कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता परीक्षेला सामोरे जावे.कुणीही स्वतःला कमी न समजता आपल्या पध्दतीने अभ्यास करावा व जीवनात यशस्वी व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या.माजी नगरसेवक दामोदर मानकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्याना आपल्या जीवनातील स्व अनुभव कथन केले.मी आजही एम.ए.ला अॅडमिशन घेऊन शिक्षण घेत आहे.तसेच तुम्ही सुध्दा तुमच्या आयुष्यात भरपुर शिका व मोठे व्हा.परीक्षेसाठी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना हार्दीक शुभेच्छा.सुत्रसंचालन शालेय पंतप्रधान कु.अनुष्का गीते हिने केले.आभार प्रदर्शन प्राचार्य संजय डेर्ले यांनी केले.त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करुन परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.इ.१० वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे वर्गवार ग्रुप फोटो काढण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांना शेवटी अल्पोपहार देऊन गोड सांगता करण्यात आली.कार्यक्रमास उपप्राचार्य राजेंद्र गाडे,पर्यवेक्षिका माधुरी थेटे,इ.१० वीचे सर्व वर्गशिक्षक,विषयशिक्षक, शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment