मखमलाबाद विद्यालयात इ.१०वी चा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
फोटो - शिक्षक पालक मेळाव्यात पालकांना मार्गदर्शन करतांना प्राचार्य संजय बोरस्ते.याप्रसंगी व्यासपिठावर मविप्र संचालक रमेश पिंगळे,उपाध्यक्ष वाळु काकड,योगिता शिंदे,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,पालक व शिक्षकवृंद
मखमलाबाद - मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे इयत्ता १० वी चा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संचालक रमेश पिंगळे हे तर प्रमुख पाहुणे म्हणुन आय.टी.आय चे प्राचार्य संजय बोरस्ते हे उपस्थित होते.याप्रसंगी व्यासपिठावर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष वाळू काकड,सदस्या योगिता शिंदे,आय.टी.आय.चे प्रा.भाऊसाहेब गडाख,प्रा.हेमंत उगले,प्रा.बाळासाहेब टर्ले,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे उपस्थित होते.मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वतीपुजन,शिवप्रतिमापुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजय डेर्ले यांनी केले.त्यांनी कार्यक्रम आयोजीत करण्यामागील उद्देश सांगितला.पालक मेळावा खास करुन मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या पालकांकरिता आयोजित करण्यात आलेला आहेत.उपस्थित सर्व मान्यवरांचे पुस्तक व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.प्रमुख पाहुणे प्राचार्य संजय बोरस्ते यांनी आपल्या मनोगतात पालकांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितले की,जे विद्यार्थी अतिहुशार असतात,ज्यांना ८०% ते ९८% गुण मिळवितात ते डाॅक्टर्स,इंजिनियर्स व इतर मोठ्या ठिकाणी नोकरी करतील,पण जे विद्यार्थी ६०% ते ७०% च्या आसपास गुण मिळवितात त्यांना आय.टी.आय.मध्ये विविध कोर्सेस उपलब्ध आहेत.हे कोर्सेस करुन सुध्दा विद्यार्थी विविध व्यवसाय करु शकतात,विविध मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरी करु शकतात.कार्यक्रमाचे अध्यक्ष मविप्र संचालक रमेश पिंगळे यांनी पालकांचे स्वागत करुन बहुमोल मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितले की,आपला पाल्य सर्वसाधारण असला,त्याला कमी गुण मिळाले तर त्यांनी स्वतःला कमी लेखु नये.अशा विद्यार्थ्यांनी आय.टी.आय.मध्ये प्रवेश घेऊन विविध कोर्सेस करण्याची संधी त्यांना उपलब्ध आहेत.हे कोर्सेस करुन तो व्यवसाय व नोकरी करुन आपल जीवनमान उंचावू शकतो.सुत्रसंचलन जेष्ठ शिक्षक संतोष उशीर यांनी तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांनी केले.कार्यक्रमास मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचे पालक,आय.टी.आयचे प्रा.भाऊसाहेब गडाख,प्रा.हेमंत उगले,प्रा.बाळासाहेब टर्ले उपस्थित होते.इयत्ता १० वी चे वर्गशिक्षक रुपाली शिंदे,हेमराज जाधव,प्रविण कारे,बाळु पवार,अशोक गावले,मनिषा पाटील,स्वाती होळकर,शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी सहकार्य केले.
Comments
Post a Comment