मखमलाबाद विद्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती व कर्मवीर अॅड.बाबुराव ठाकरे पुण्यतिथी साजरी

फोटो - राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती व कर्मवीर बाबुराव ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापुजन करतांना प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,पर्यवेक्षिका माधुरी थेटे,शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी

मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर अॅड.बाबुराव गणपतराव ठाकरे यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपिठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे,पर्यवेक्षिका माधुरी थेटे,जेष्ठ शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.कु.अथर्व थोरवत याने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवनकार्याविषयी सखोल माहिती दिली.गाडगे महाराज यांनी आपले संपूर्ण जीवन समाज कार्यासाठी वाहुन घेतले होते.त्यांनी गावोगावी भजन,किर्तन करुन समाजप्रबोधनाचे महान कार्य केले.खेड्यापाड्यात जाऊन रस्ते व गावे स्वच्छ करुन स्वच्छतेचा मंत्र दिला.कु.प्रांजल सोज्वळ हिने मविप्र समाज संस्थेचे कर्मवीर अॅड.बाबुराव गणपतराव ठाकरे यांच्या जीवनकार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.अॅड.बाबुराव ठाकरे यांचा जन्म चांदवड तालुक्यातील गणुर या छोट्याशा खेडेगावात शेतकरी कुटुंबात १२ मार्च १९२६ ला झाला.या घरात बहीण भाऊ धरुन १२ भावंडे होती.मॅट्रीकची परीक्षा पास झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी नाशिकच्या एच.पी.टी.महाविद्यालयात प्रवेश घेतला.त्यानंतर पुणे येथे विधी महाविद्यालयात कायद्याचा अभ्यास करुन १९५० मध्ये ते एल.एल.बी.झाले.प्राचार्य संजय डेर्ले यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देऊन स्वच्छतेच्या मंत्राचा उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा आदर्श यानिमित्ताने घेऊन आपण आपली शाळा स्वच्छ ठेवली पाहीजे.तसेच त्यांनी कर्मवीर अॅड.बाबुराव ठाकरे यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.अॅड.बाबुराव ठाकरे यांनी नाशिकला वकिली व्यवसाय सुरु केला.या व्यवसायात त्यांनी खेड्यातील समाजाला,शेतकर्‍यांना योग्य प्रकारे सल्ला देऊन समाजकार्य केले.मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमध्ये अनेक वर्ष त्यांनी सरचिटणीस या पदावर काम केले.मविप्र संस्थेत काम करतांना त्यांनी त्यांचा करारीपणा कधी कमी होऊ दिला नाही.त्यांच्या काळात त्यांनी संस्थेच्या प्रगतीबरोबरच शिस्त,गुणवत्ता व पारदर्शकता याकडे विशेष लक्ष दिले.खेड्यापाड्यात संस्थेच्या विविध शाखा सुरु करुन विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करुन दिली.मविप्र संस्थेच्या प्रगतीस,भरभराटीस त्यांचा फार मोठा वाटा आहे.कु.श्रेया शिंदे हिने सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका संगिता कुशारे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला