जनता विद्यालयाचा शासकीय रेखाकला इंटरमिजेट ग्रेड परीक्षेचा १००% निकाल
नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथील विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला इंटरमिजेट ग्रेड परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र शासन संचलित कलासंचलनालय, मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला इंटरमिजेट स्पर्धेचा निकाल हा १००% लागला आहे. स्पर्धेत सहभागी व सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका एम. एस . डोखळे, जेष्ठ शिक्षिका के.एस.आगळे , एम.एस. पिंगळे व कलाशिक्षक गायखे एस.एम यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले.
Comments
Post a Comment