भगवान विश्वकर्मा जयंती धांद्रीला मोठ्या उत्साहात संपन्न
बागलाण :- ब्रम्हांडाचे निर्माते रचनाकार
भगवान श्री विश्वकर्मा यांच्या जयंती निमित्त धांद्री येथे विश्वकर्मा चौकात भगवान विश्वकर्मा प्रतिमा पुजन अभिवादन सोहळा संपन्न झाला.कारागीरांचे दैवत देवदेवताचे रचनाकार म्हणून भगवान विश्वकर्मा यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. नाशिक महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात भगवान विश्वकर्मा जयंती विश्वकर्मिय बांधव उत्साहात साजरी करतात त्याचप्रमाणे विश्वकर्मा जयंती निमित्त धांद्री गावात प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. धांद्री गावाच्या वतीने सार्वजनिक जयंती साजरी करण्यात आली.यावेळी शिवसेना नेते गजेंद्र( बापु) चव्हाण, नंदु सोणवणे, (सरपंच) विश्वास जगन्नाथ चव्हाण, महेश चव्हाण, सोपान मोरे, भिला निकम, प्रकाश निकम,योगेश चव्हाण,अमुत चव्हाण, नितीन चव्हाण, निखिल निकम, अक्षय निकम, गणेश मोरे,चंद्रकांत चव्हाण, प्रशांत पवार, मनाजी बस्ते, राजु पानपाटील, नितीन चव्हाण, गोरख निकम,पप्पु चव्हाण, महेंद्र मोरे,अनुप चव्हाण, आकाश चव्हाण, बंटी चव्हाण,योगेश चव्हाण, राकेश बस्ते, प्रविण मोरे, दिलीप बच्छाव, पप्पु ढाले, देवा माळी, केदा बोरसे, बापु अहिरे,योगेश गायकवाड, राजेंद्र चव्हाण, अरुण बस्ते, कल्पेश अमुतकार, निलेश पवार, समाधान बस्ते, रवि बत्तीसे, सुनिल अहिरे, संदीप जावरे, सागर चव्हाण, शुभम चव्हाण, जयदिप मोरे, बाबाजी मोरे, शरद जगताप, विवेक भालेराव, निलेश दळवी,हिरा चव्हाण, जयेश गरुड,गणेश लांडगे, बापु चव्हाण,राहुल बोरसे, समाधान गायकवाड, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment