मखमलाबाद विद्यालयात दक्षता समितीची सहविचार सभा संपन्न


फोटो - दक्षता समितीस मार्गदर्शन करतांना उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ पिंगळे व उपस्थित सर्व मान्यवर


मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे एस.एस.सी.व एच.एस.सी.या दोन्ही परीक्षेंचे केंद्र असुन या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मविप्र संचालक रमेश पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता समितीची स्थापणा करण्यात आली.या दक्षता समितीची सहविचार सभा उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयात संपन्न झाली.याप्रसंगी सहविचार सभेस माजी नगरसेवक दामोधर मानकर,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष वाळू काकड,व्ही.एन.नाईक संस्थेचे माजी संचालक गोकुळ काकड,शालेय समिती सदस्य प्रभाकर फडोळ,कल्पना पिंगळे,माता पालक संघाच्या सदस्या योगिता शिंदे,प्राचार्य राजेंद्र गाडे,ज्युनिअर काॅलेज प्रमुख उज्वला देशमुख जेष्ठ शिक्षक संतोष उशीर,सोमेश्वर मुळाणे उपस्थित होते.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.प्राचार्य संजय डेर्ले यांनी प्रास्ताविक केले.त्यांनी सांगितले की मखमलाबाद विद्यालयात एस.एस.सी.व एच.एस.सी.या दोन्ही परीक्षेंचे केंद्र असुन इ.१२ वीचे पेपर २१ फेब्रुवारी व इ.१० वीचे पेपर १ मार्चपासुन सुरु होत आहे.या दोन्ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी दक्षता समितीची स्थापणा करण्यात आली आहे.त्यानंतर माजी नगरसेवक दामोधर मानकर व या समितीतील सर्वांनी आपली विविध मते मांडली.यामध्ये असे सुचविले की,परीक्षार्थींशिवाय कोणाही पालकाला प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश देऊ नये.वाहनांची पार्कींग बाहेरच करावी.पोलीस बंदोबस्त असावा.विद्यार्थ्यांना शांततेत व सुरळीत पेपर लिहीता यावा यासाठी शालेय परिसरात शांतता प्रस्थापित करणे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जेष्ठ शिक्षक संतोष उशीर यांनी तर आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षक सोमेश्वर मुळाणे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला