राज्यस्तरीय धनगर साहित्य संमेलनात समाधान बागल यांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव
सोलापूर:- बेलाटी इथे राज्यस्तरीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन मध्ये नाशिक जिल्ह्याचे समाज भूषण प्रहार सरचिटणीस समाधान बागल यांना समाजरत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
नाशिक मधील होळकर शाळेचा विकास सर्व समाजात प्रचार प्रसार करण्यात, तसेच अहिल्यादेवी होळकरांनी जे कार्य केले आहे त्याची प्रशासनाशी दखल घेऊन त्या ठिकाणी मा अहिल्यादेवीची कार्याचा गजर करणे. दिव्यांग शेतकरी, दुर्बल घटकातील समाजातील लोकांसाठी धावून जाणे, दुर्लक्षित होळकर शाही वास्तूंकडे प्रशासनाचे लक्ष केंद्रित करणे. या बहुमूल्य उपक्रमांसाठी सोलापूर बिलाटी येथे झालेल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलन मध्ये मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आली. याप्रसंगी समाधान बागल यांनी हा पुरस्कार समाजाला समर्पित केला.
याप्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस, माजी आमदार रामहरी रुपनवर, डॉक्टर अभिमन्यू टकले, श्रीराम पाटील, बाळासाहेब कर्णवर, प्राचार्य चोपडे, संभाजी सूळ, विनायक कळदाते, ज्ञानेश्वर ढेपले,आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment