मखमलाबाद विद्यालयात कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांची जयंती उत्साहात साजरी
फोटो - कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांच्या जयंती प्रसंगी प्रतिमापुजन करतांना प्राचार्य संजय डेर्ले,शिक्षकवृंद व सहभागी विद्यार्थी
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.कु.श्रेया शिंदे हिने कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांच्या जीवनकार्याविषयी सखोल माहिती दिली.त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९०६ रोजी सिन्नर येथे झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण नाशिक येथे झाले.महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या सहाय्याने बी.ए. व पुढे पुणे येथे कायद्याची पदवी घेतली.सत्यशोधक चळवळ व पुढे काँग्रेस चळवळीचा त्यांच्यावर वैचारिक प्रभाव होता.राजर्षी शाहु महाराज व बडोदा संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड,रावसाहेब थोरात यांच्यापासुन प्रेरणा घेऊन पांडुरंग तथा अण्णासाहेब मुरकुटे यांनी शैक्षणिक कार्य सुरु केले.सन १९३४ मध्ये प्रारंभी खजिनदार म्हणुन संस्थेच्या कामकाजाला सुरुवात केली.संस्था तसेच शैक्षणिक शाखांमध्ये आर्थिक शिस्त निर्माण करतांनाच प्रशासकिय घडी बसविली.१९४८ मध्ये त्यांची सरकारी वकील म्हणुन नियुक्ती झाली.त्यांनी सरकारी वसतीगृहे व शाळांच्या विकासासाठी आश्रयदाते मिळविण्यावर भर दिला.निस्पृह वृत्ती,सेवाभाव,करारीपणा,वक्तशीरपणा व स्वच्छ प्रशासन या गोष्टींना त्यांचे प्राधान्य असे.मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे यांचे ते आजोबा होते.मविप्र संस्थेचा जो वटवृक्ष आज वाढलेला आहेत,त्याचे सर्व श्रेय या कर्मवीरांना जाते.सुत्रसंचलन अर्चना दिघे यांनी केले.आभार प्रदर्शन कु.ज्ञानेश्वरी काकड हिने केले.या विद्यार्थ्यांना जेष्ठ शिक्षिका योगिता मोगल यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment