तपोवन मंडल भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन
नाशिक :- अमृतधाम चौफुली येथे मागील हफ्त्याभरात दोन दुर्दैवी अपघाती घटना घडल्या त्यातील एका घटनेत विनिता कुयते नावाच्या एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला.या घटना वारंवार घडत असल्याने ही गोष्ट आणि त्यावर असणाऱ्या उपाययोजना प्रशासनाच्या कानावर घालण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा तपोवन मंडल च्या वतीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये अमृतधाम चौफुली येथे सिग्नल बसविणे व अतिक्रम हटवणे तसेच वाहतूक नियंत्रणात आणणे या मागण्या करण्यात आल्या आहेत.
तपोवन मंडलाच्या युवा मोर्च्याच्या निवेदन पत्राची पोलीस आयुक्तांकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली व त्यावर लवकरच कार्यवाही करून परिस्थिती नियंत्रणात आणू असे आश्वासन देखील तपोवन मंडलाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.सिग्नल यंत्रणा जो पर्यंत बसवण्यात येत नाही तोपर्यंत प्रशासनाकडून तिथे वाहतूक पोलिसांना नियंत्रणासाठी पाठवण्यात येईल व तेथील यंत्रणा राबवण्यासाठी ते स्वतः व्यक्तिक लक्ष घालतील असे देखील आयुक्तांकडून सांगण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा तपोवन मंडलाचे अध्यक्ष अविनाश पिंपरकर,सरचिटणीस शुभम काळे,सरचिटणीस रोशन ठोके,उपाध्यक्ष -तन्मय गरड,विकी पगारे, अक्षय महाले,देवेंद्र काळे,कौशल पाटील,ललित पगार,जय खेमणार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment