मखमलाबाद विद्यालयाचे मविप्र चित्रकला स्पर्धेत घवघवीत यश
फोटो - मविप्र चित्रकला स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतांना प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,कलाशिक्षक सोमेश्वर मुळाणे,सुधीर तांबे,स्मिता मुळाणे व गुणवंत विद्यार्थी
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय मविप्र चित्रकला स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हास्तरीय मविप्र चित्रकला स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.यावर्षी मखमलाबाद विद्यालयातील एकुण ६४६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी सहभाग घेतला होता.या स्पर्धेतील गट क्रमांक २,३ व ४ या तिन्ही गटांचा निकाल १००% लागला असुन ८ विद्यार्थ्यांनी संस्थेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहेत.*
*गट क्रमांक २ - इ.५ वी / ६ वी = निकाल १००%*
*दुसरा क्रमांक - कु.कवर साहील कांतीलाल इयत्ता ५ वी - गुण ९२*
*पाचवा क्रमांक - कु.भोजणे श्रृष्टी विष्णु इयत्ता ६ वी - गुण ८६*
*गट क्रमांक ३ - इ.७ वी / ८ वी = निकाल १००%*
*तिसरा क्रमांक - कु.भोये अवनी देविदास इयत्ता ८ वी - गुण ९१*
*तिसरा क्रमांक - कु.शर्मा तनिष्का राजेंद्र इयत्ता ७ वी - गुण - ९१*
*गट क्रमांक ४ - इ.९ वी / १० वी = निकाल १००%*
*दुसरा क्रमांक - कु.पागी राणी भाऊराव इयत्ता १० वी - गुण ९४*
*तिसरा क्रमांक - कु.कांडेकर श्रावणी संजय इयत्ता - १० वी - गुण ९३*
*चवथा क्रमांक - कु.गिते अनुष्का सचिन इयत्ता १० वी - गुण ९२*
*पाचवा क्रमांक - कु.गवळी कृष्णा प्रकाश इयत्ता १० वी - गुण ९०*
*या यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सोमेश्वर मुळाणे,सुधीर तांबे,स्मिता मुळाणे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र संचालक रमेश पिंगळे,मविप्र शिक्षणाधिकारी डाॅ.भास्करराव ढोके,शिक्षणाधिकारी डाॅ.अशोकराव पिंगळे,उच्च माध्यमिक स्कुल कमिटी अध्यक्ष पंढरीनाथ पिंगळे,अभिनव बाल विकास मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष निवृत्ती महाले,कला व वाणिज्य महाविद्यालय समितीचे अध्यक्ष सुरेश पिंगळे,होरायझन स्कुल कमिटीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे,सर्व स्कुल कमिटी सदस्य,सभासद,ग्रामस्थ,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,पर्यवेक्षिका माधुरी थेटे,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment