Posts

श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या अंगी शौर्याबरोबरच चारित्र्यसंपन्नता होती - व्याख्याते नजान लक्ष्मण

Image
चांदवड :- 11 एप्रिल रोजी चांदवड जिल्हा नाशिकच्या ऐतिहासिक भूमीमध्ये श्रीमंत मल्हारराव होळकर यांची जयंती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिकच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीच्या निमित्ताने होळकर शाहीवरील प्रसिद्ध व्याख्याते लक्ष्मण नजान यांनी व्याख्यान देताना अनेक इतिहासकारांचे दाखले देत सांगितले की, श्रीमंत मल्हारराव होळकर यांनी मराठेशाहीतील सर्वात मोठी मोहीम ठरलेल्या अटकेपारच्या मोहिमेत जसा अत्युच्च पराक्रम करून आपली मराठेशाहित उपयुक्तता सिद्ध केली, अगदी त्याचप्रमाणे सार्वजनिक जीवन जगत असताना श्रीमंत मल्हारराव होळकरांनी अनेकांना चारित्र्यसंपन्नतेचा आदर्श घालून दिला. ब्रिटिश इतिहासकार कर्नल टॉडच्या मते श्रीमंत मल्हारराव होळकर हे अठराव्या शतकात उच्चराजनैतिक गुण असलेले पराक्रमी पुरुष होते. तर श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या कारकीर्दीचा प्रत्यक्षदर्शी असलेला फ्रेंच सेनानी बुसी सांगतो की, श्रीमंत मल्हारराव होळकर हे वचननिष्ठ व त्याकाळी असलेली दुर्मिळ असामान्य प्रामाणिकता जपणारे व्यक्ती होते. तसेच...

नाशिक मधील मोठा राजवाडा परिसरात डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Image
नाशिक :- मोठा राजवाडा नाशिक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आयोजित मिरवणुकीचा शुभारंभ राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. तसेच उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, रंजन ठाकरे, प्रशांत जाधव, विलास शिंदे, आनंद सोनवणे, संजय साबळे, बाळासाहेब पाठक, शरद काळे, संजय खैरनार, नाना पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लासलगाव महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

लासलगाव :- येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, प्रा.सुनिल गायकर आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आदी यावेळी उपस्थित होते.   कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.