लासलगाव महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी


लासलगाव :- येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, प्रा.सुनिल गायकर आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आदी यावेळी उपस्थित होते.  
कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी