समृद्ध लोकशाही संदर्भात मिरज येथे रेड लाईट एरियामध्ये मतदान जनजागृती अभियान

सांगली :-  281 मिरज विधानसभा मतदारसंघ, उत्तम नगर येथे समृद्ध लोकशाही संदर्भात मिरज येथे रेड लाईट एरियामध्ये मतदान जागृती अभियानांतर्गत रेड लाईट एरिया येथे तहसिलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती मोहिम राबविण्यात आली .

यावेळी सोडा आपले सर्व काम, चला करूया आपले मतदान ! चुनाव नही, मतदान करे ! नवभारत का निर्माण करे ! अशा प्रबोधनपर घोषणा देऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रबोधन फेरीनंतर कॉर्नर सभेमध्ये नोडल ऑफिसर तथा उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी पूजा कणसे, स्वीप सदस्य संगीता खटावकर, शफिया जमादार व आस्था बेघर महिला निवारा केंद्र, भीमांगन महिला संस्थेच्या सुरेखा शाहीन शेख यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक वेश्या एड्स मुकाबला परिषदेचे मीनाक्षी कांबळे यांनी तर स्वागत श्रीमती रेणुका काळे यांनी केले. याप्रसंगी निर्भयपणे मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी जनकल्याण आरोग्यसेवा फाउंडेशनचे रमजान खलिफा, राजेश साळुंखे यांच्यासह परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला