चांदवडला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा संपन्न
रामदास काळे, यांनी चांदवडच्या स्थानिक इतिहासाला उजाळा देत आठव्या शतकापासून सर्व इतिहास चांदवडकरांना सांगितला रामायण काळात अगस्ती ऋषींचे आगमन झाले अगस्ती ऋषींचे आश्रम चांदवड शहराला लाभले त्यानंतरच्या काळामध्ये धार्मिक रुडींमध्ये व कामांमध्ये चांदवड शहर अग्रस्थानी होते. काळासोबत दिवस बदलत गेले तसे जळगावच्या राजांचा परगाना म्हणून चांदवड हा एक परगाना गणला जात होता. चांदवडला छत्रपती राजांच्या परगण्यामुळे खूप सांस्कृतिक देणग्या लाभल्या ज्यामध्ये चांदवड तालुक्यातील कसमादे पट्यात बोलली जाणारी खान्देशी सुद्धा धरावीच लागेल त्यानंतर राष्ट्रकूटांच्या काळामध्ये चांदवड तसेच आसपासच्या परिसरामध्ये साधारण २०० मंदिरांची उभारणी करण्यात आली आणि या मंदिरांची रचना ही हेमाडपंथी स्वरूपाची बघावयास मिळत आहे. नंतरच्या काळामध्ये चांदवड वरती चंद्रहास राजाचे राज्य झाले. चंद्राहास राजाने या प्रदेशाचा चांगला विकास घडवून आणला व स्थानिक परिसरामध्ये तसेच चांदवडच्या परगण्यामध्ये चांगल्या पद्धतीने राज्य चालवले याच काळामध्ये तेली समाजाची भरपूर मोठी संख्या चांदवड शहरांमध्ये होती व चंद्रहास राजाने आपली राजधानी म्हणून चांदवड वरुन राज्यकारभार केला. शनी महात्म्य मध्ये चांदवडचा उल्लेख हा ताम्रलिंदापुरम म्हणून केलेला आढळतो यासोबतच चांदवडला जैन साधूंचा पदस्पर्श झालेला आहे. पार्श्वनाथ जैन मंदिर तसेच जैन लेणी चांदवड मध्ये बघावयास मिळतात मार्तंड ऋषींचे पदस्पर्श या चांदवड नगरीला झालेले आहेत. आणि या सर्वांवरून या चांदवड नगरीचे धार्मिक महत्त्व हे मोठा असल्याचा उलगडा व्याख्यात्यांनी प्रसंगी केला.
कार्यक्रमाप्रसंगी चांदवडच्या व्यापार व्यवसाय यावर बोलताना चांदवड मधील पूर्वीचा तांब्याचा व्यवसाय त्यानंतर तेली समाजाची मोठी व्याप्ती व तेलाचा व्यवसाय त्याचप्रमाणे हातमाग , बूट बनवण्याचा व्यवसाय त्याचप्रमाणे फनी मध्ये तेल ओतुन डोक्याला लावण्याचे चांदवडकरांचे संशोधन चांदवडी पेढा खवा अंजीर यासर्व ऐतिहासिक व्यापार उद्योग व व्यवसायावर त्यांनी प्रकाश टाकला त्यानंतरच्या काळामध्ये राजा विक्रमादित्य यांची कहाणी ही त्या ठिकाणी रोचक असल्याचे सांगितलं राजा विक्रमादित्यांना याच चांदवड नगरीच्या जवळच शनि महाराजांनी दर्शन दिल्याने येथील पुरातन शनी मंदिर ही प्रसिद्ध आहे मंदिरांमध्ये गणूर रस्त्यावरील पातळेश्वर मंदिर,गणपती मंदिर, चंद्रेश्वर महादेव मंदिर,रेणुका देवी मंदिर,सातपिर व इतर सर्वच मंदिर जी मंदिर नंतरच्या काळात मुस्लिम राजांचा वावर वाढल्याने व मुगल राज्यातील सरदारांनी या मंदिरांचा भग्न करण्याचं काम केलं त्यातील बरेच मंदिर नामशेषही झाली.
परंतु नंतरच्या काळामध्ये होळकरांचे राज्य आले आणि सुभेदार मल्हारराव होळकर व अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिरांचा जिर्णोद्धाराचे काम हाती घेतलं पाण्याचं सूक्ष्म नियोजन केलं आणि परिसरातील मनुष्यांसोबतच मुक्या जनावरांचे ही अन्न व पाण्याची गरज पूर्ण होईल याकडे त्यांनी काळजीने लक्ष दिलं या सर्व गोष्टींमुळे चांदवडची भरभराट झाली आणि चांदवड चा परिसर भरभराटीस येऊ लागला तत्कालीन युद्धाच्या परिस्थितींमध्ये चांदवडचे महत्त्वही वक्त्यांनी सांगितले.नाशिक इंदोर व विदर्भाकडे जाणारा मुख्य रस्ता चांदवड येथुन होता.आणि या मुख्य रस्त्यामध्ये असणारा घाट हा चांदवड जवळ असल्याने चांदवडचं सामरिक महत्त्व अद्वितीय होत त्याही गोष्टीवर व्याख्यात्यांनी प्रकाश टाकला आणि म्हणूनच चांदवड ज्याच्या ताब्यात त्या माणसाने एखाद्या गोष्टीत पाय टाकल्यानंतर ती गोष्ट पूर्ण होत नसते असे इतिहासात म्हटल जायचं त्याचप्रमाणे चांदवडला हिंदू धर्मांच्या मंदिरांच्या जिर्नोद्धारा बरोबरच अहिल्यादेवी होळकर व मल्हारराव होळकर यांनी मज्जिदी व सात पिराचे स्थान अशा विविध मुस्लिम मंदिरांनाही देणग्या दिल्या व ईदीच्या काळामध्ये संस्थानातर्फे ईदी देण्याचे काम मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य देण्याचे काम जमिनी देऊन त्यावेळी मंदिरांचे रक्षण व्हावं व तिथली दिवाबत्ती चालू राहावी यासाठी व्यवस्था करून दिलेली आहे अहिल्यादेवी होळकरांच्या राज्यातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक हे चांदवड शहर असल्याचं या ठिकाणी व्याख्यात्यांनी नमूद केलं त्याचप्रमाणे चांदवड शहरात १८५७ साली सुद्धा स्वातंत्र्याचा उठाव झाला होता.याही गोष्टीकडे लक्ष वेधण्यात आले सर्वसामावेशक इतिहासाची मान्यता सांगून देशमुखांचा वाडा खरेदी करून त्या वाड्याचा कायापालट करून हा भव्य रंगमहाल अहिल्यादेवी होळकरांनी घडवला या इतिहासाला उजाळा देण्याचे काम व्याख्याते रामदास काळे यांच्याकडून करण्यात आले चांगले कार्यक्रम घेऊन या इतिहासाला जाग करण्याची संधी प्राप्त करुन दिली यासाठी व्याख्याते यांनी आयोजन समितीचे आभार मानले.
Comments
Post a Comment