म वि प्र समाजाच्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा १६ वा पदवीदान समारंभ

नाशिक :- म वि प्र समाजाच्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा १६ वा पदवीदान आणि 'इम्पॅक्ट' मासिकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला.समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल श्री राजीव कानिटकर उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे,डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, मविप्र कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्या डॉ.अमृत कौर उपस्थित होते. कार्यक्रमाकरीता पदवीधर, त्यांचे पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि मविप्र समाज कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी नवीन पदवीधर विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. लेफ्टनंट जनरल श्री राजीव कानिटकर यांनी फिजिओथेरपी उपचाराचा त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला. याप्रसंगी मविप्र समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी सर्व पदवीधरांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पदवीधरांना विशेष पारितोषिके देण्यात आली. यात बेस्ट आऊटगोईंग विद्यार्थिनी महिमा दधीच; बेस्ट ऑलराऊंडर - दानिश शेख ; सर्वोत्कृष्ट इंटर्न वृषभ पवार आणि मेघना खडिलकर यांचा समावेश होता. डॉ.प्रितेश येवले आणि डॉ.रुतिका ठाकूर-निकम यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका डॉ श्रुंखला मिलिंद कौशिक ; विद्यार्थिनी रिशा शेख आणि संस्कृती पिंजरकर यांनी केले. राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला