पत्रकार भैयासाहेब कटारे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार रत्न पुरस्कार
देवळाली कॅम्प प्रतिनिधी :- गरुड फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व व्यंकटेश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यामानाने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार समारंभ 2024 पार पडला.
राज्यस्तरीय "आदर्श पत्रकार रत्न पुरस्कार 2024" हा पुरस्कार नाशिक तालुका मराठी पत्रकार संघांचे "तालुका संघटक" पत्रकार भैयासाहेब कटारे यांना देण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षेतर संघटनांचे महामंडळ सेक्रेटरी शिवाजी खांडेकर यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
हा कार्यक्रम आळंदी पुणे येथील समृद्धी मंगल कार्यालय येथे रविवारी (दिनांक 21) पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी जनसंपर्क अधिकारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मधुकर चव्हाण माजी नगराध्यक्ष आळंदी नगरपरिषद आळंदी दे. राहुल चिताळकर, गरुड फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आकाश पुजारी, व्यंकटेश बहुउद्देशाय सेवाभावी संस्था आळंदी अध्यक्ष शिवकुमार देवकाते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment