गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांच्याकडून चंदन पवार यांना डॉक्टरेट घोषित
नाशिक :- सामाजिक, राजकीय आणि उद्योगक्षेत्रात आपली कारकीर्द दिवसेंदिवस प्रगती पथावर नेणारे पिंपळगाव या गावातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले चंदन पवार यांना नेपाळच्या गांधी पीस फाउंडेशनने सामाजिक आणि राजकीय कार्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पुणे येथील जी.डी. माडगुळकर सभागृहात, 20 एप्रिल 2024 रोजी, पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा यांच्या उपस्थितीत डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे.
गांधी पीस फाउंडेशनचे भारताचे नॅशनल हेड डॉ. सूनिलसिंह परदेशी यांनी पवार यांची डॉक्टरेट पदवीसाठी निवड केली. तशी घोषणा त्यांनी पवार यांना पत्र देवून केली आहे, डॉक्टरेट मिळाल्याबद्दल पवार यांचे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व्यक्ती, उद्योगपतीं आणि इतर सर्वच स्व्यतरातील अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment