नाशिक मधील मोठा राजवाडा परिसरात डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
नाशिक :- मोठा राजवाडा नाशिक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आयोजित मिरवणुकीचा शुभारंभ राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. तसेच उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, रंजन ठाकरे, प्रशांत जाधव, विलास शिंदे, आनंद सोनवणे, संजय साबळे, बाळासाहेब पाठक, शरद काळे, संजय खैरनार, नाना पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment