मखमलाबाद विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापुजन करतांना प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे महात्मा जोतिबा फुले यांची जयंती माठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपिठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे व जेष्ठ शिक्षकृंद,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.प्राचार्य संजय डेर्ले यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली.त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,महात्मा जोतीराव फुले हे समाजातील असमानतेला प्रखर विरोध करणारे थोर समाजसुधारक होते. समतेचा पुरस्कार करणारे ते कृतिशील विचारवंत होते.१९ व्या शतकातील कर्मठ,लुटारु अन् जुलुमी मानसिकतेच्या लोकांविरूध्द नुसते विचार मांडून,बोलत न बसता त्याविरुद्ध कृतिशील कार्य त्यांनी उभारले. पिडीत पददलित समाज सुधारण्यासाठी अन् महिलांना समानता प्रदान करण्यासाठी त्यांना सुशिक्षित करणे खुप गरजेचे आहे हे वास्तव जाणुन,स्वत:च्या पत्नीला सावित्रीमाईंना शिक्षण देऊन भारतातील मुलींची पहिली शाळा त्यांच्या मदतीने त्यांनी सुरू केली. दलितांच्या उद्धारासाठी काम करत असताना स्वतःच्या घरातील पाण्याची विहीर त्यांच्यासाठी खुली करून प्रथमच समाजात इतरांसाठी आदर्श निर्माण केला.अत्याचार पिडीत महिला, विधवा अन् मुलींसाठी वसतिगृह,सुतिकागृह सुरू केलें, विधवा महिला विदृपीकरण थांबविण्यासाठी त्यांचें केशवपन बंद केले. त्यांच्या ह्या सगळ्या कृतिशील कार्यामुळे लोकांनी मुंबईत त्यांचा सत्कार करत त्यांना मुक्तीचा "महात्मा" ही पदवी प्रदान केली.सुत्रसंचलन जेष्ठ शिक्षक दिलीप सोनवणे यांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment