श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या अंगी शौर्याबरोबरच चारित्र्यसंपन्नता होती - व्याख्याते नजान लक्ष्मण
चांदवड :- 11 एप्रिल रोजी चांदवड जिल्हा नाशिकच्या ऐतिहासिक भूमीमध्ये श्रीमंत मल्हारराव होळकर यांची जयंती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिकच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या जयंतीच्या निमित्ताने होळकर शाहीवरील प्रसिद्ध व्याख्याते लक्ष्मण नजान यांनी व्याख्यान देताना अनेक इतिहासकारांचे दाखले देत सांगितले की, श्रीमंत मल्हारराव होळकर यांनी मराठेशाहीतील सर्वात मोठी मोहीम ठरलेल्या अटकेपारच्या मोहिमेत जसा अत्युच्च पराक्रम करून आपली मराठेशाहित उपयुक्तता सिद्ध केली, अगदी त्याचप्रमाणे सार्वजनिक जीवन जगत असताना श्रीमंत मल्हारराव होळकरांनी अनेकांना चारित्र्यसंपन्नतेचा आदर्श घालून दिला.
ब्रिटिश इतिहासकार कर्नल टॉडच्या मते श्रीमंत मल्हारराव होळकर हे अठराव्या शतकात उच्चराजनैतिक गुण असलेले पराक्रमी पुरुष होते. तर श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या कारकीर्दीचा प्रत्यक्षदर्शी असलेला फ्रेंच सेनानी बुसी सांगतो की, श्रीमंत मल्हारराव होळकर हे वचननिष्ठ व त्याकाळी असलेली दुर्मिळ असामान्य प्रामाणिकता जपणारे व्यक्ती होते.
तसेच ब्रिटिश इतिहासकार विल्यम एरवीन सांगतो की श्रीमंत मल्हारराव होळकर हे त्यांच्या कारकिर्दीत पराक्रम व शौर्याच्या जीवावर अत्युच्च यशाच्या शिखरावर असतानाही ते पेशव्याशी शेवटपर्यंत निष्ठावंत राहिले, मराठा दौलतीशी प्रामाणिक राहिले.
परकीय इतिहासकारांबरोबरच इतिहासकार शेजवलकर, रियासतकार, आपटे, अ.रा.कुलकर्णी यांची अनेक मल्हाराव होळकर विषयीची मते सांगून श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या व्यक्तिमत्वावर त्यांनी प्रकाश टाकला. याप्रसंगी अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज युवराज यशवंतराव शिवाजीराव होळकर, हे प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित होते तसेच अमरजीत दादा बारगळ स्वप्निल राजे होळकर यशपाल भिंगे सर नानासाहेब होळकर पळशीकर सरदार मुकुंदराज होळकर असे स्वराज्याचे 40 शिलेदार उपस्थित होते याप्रसंगी मल्हार श्री पुरस्कार व मल्हारत्न पुरस्कार गौरव करण्यात आला यामध्ये भारतभरातून होळकर शाळेचे इतिहास सक्षोधक व्याख्याते उपस्थित होते या सोहळ्यासाठी धर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती मार्फत हा सोहळा घेण्यात आला याप्रसंगी आयोजन समितीचे समाधान बागल यांनी प्रस्ताविक केले.
यशपाल भिंगे सर यांनी होळकर शाळेच्या इतिहासावरती व्याख्यान दिले यशवंत राजे होळकर यांनी सर्व होळकर नगरीचे आभार मानले इतका सुंदर सोहळा घेण्यात आला त्याबद्दल सर्व होळकर प्रेमी चे स्वागत आभार मानण्यात आली रामदासजी काळे, मच्छिंद्र भाऊ बिडकर, गणेश भाऊ निंबाळकर यांनी चांदवडच्या इतिहासाबाबत माहिती दिली. आभार प्रदर्शन विनायक काळदाते यांनी मांडले आणि सर्व सोहळ्याचे सूत्रसंचालन सुवास सुरळीकर यांनी केले.
Comments
Post a Comment