मखमलाबाद विद्यालयात भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपिठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे,ज्युनियर काॅलेज प्रमुख प्रा.उज्वला देशमुख व जेष्ठ शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कु.प्रज्योत ठाकरे व कु.आदीत्य अहिरे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी सखोल माहिती दिली.त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महु या गावी झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कुल सातारा येथे झाले.प्राचार्य संजय डेर्ले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च शिक्षण परदेशात कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये लंडन स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्स या शिक्षण संस्थेमध्ये झाले असुन अर्थशास्र या विषयात पी.एच.डी.प्राप्त केली.त्यांना एकुण २४ पदव्या मिळाल्या होत्या.बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड व श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांनी त्यांना भरपूर मदत केली होती.ते एक प्रख्यात अर्थशास्रज्ञ,न्यायशास्रज्ञ,सामाजिक विषमतेविरुध्द लढणारे ,महिला सक्षमीकरणासाठी झटणारे,दिन दलितांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचणारे,आपल्या प्रगल्भ विचारांनी समाजमनावर चिरकाल अधिराज्य करणारे एक महान नेते होते.भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार होते.त्यांनी भारतीयांना शिका,संघटीत व्हा व संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला.त्यांच्या या महान कार्यामुळेच भारत सरकारने त्यांना मरणोत्तर "भारतरत्न" हा किताब दिला.सुत्रसंचालन जेष्ठ शिक्षिका वैशाली देवरे व आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षक संतोष उशीर यांनी केले.कार्यक्रमास प्राध्यापक,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment