होळकर नगरी चांदवड येथे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव
चांदवड :- अहिल्यादेवी होळकर प्रेमी जनतेसाठी होळकर नगरी असलेल्या चांदवडला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांचा जन्मोत्सव सोहळा गुरुवार दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी होळकर वाडा (रंगमहाल) चांदवड ता.चांदवड जि नाशिक २०२४ संपन्न होत आहे.या सोहळ्यात रेणुका माता दर्शन - मंगलमय वाद्यांच्या गजरात होळकर नगरीत मिरवणूक गड पुजन मर्दानी खेळांसह राजगादीकडे प्रस्थान गजी ढोल नृत्य ऐतिहासिक घराण्यांच्या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत अतिथींच्या हस्ते तळी भंडारा स्वराज्याचे शिलेदार यांचा सन्मान तसेच मल्हार श्री पुरस्कार वितरण तसेच व्याख्यान, प्रसाद, रक्तदान शिबीर,आदींसह कार्यक्रम संपन्न होणार आहेत.सदर कार्यक्रमांचे आयोजन हिंदू रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक यांनी केले आहे.संपर्क - 9373531094
Comments
Post a Comment