ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण येथे शालेय नेतृत्व विकास कार्यशाळा संपन्न
आंबेगण वार्ताहर :- डांग सेवा मंडळ नाशिक व नवनीत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच नेतृत्व विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता ताई बिडकर होत्या. तर नवनीत फाऊंडेशन सल्लागार तसेच महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. भारती हजारी, विस्तार अधिकारी राजेंद्र नेरे, डाएट तज्ज्ञ प्रशिक्षक बाबासाहेब खरोटे,सचिन जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षणासाठी डांग सेवा मंडळाच्या अंतर्गत असलेल्या सर्व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. शालेय नेतृत्वाची जबाबदारी पार पाडताना येणाऱ्या अडचणी कशा पद्धतीने दुर करता येईल याचं उत्कृष्ट मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
नवनीत फाऊंडेशन तर्फे तज्ज्ञ प्रशिक्षक बाबासाहेब खरोटे यांनी नेतृत्व म्हणजे काय तसेच त्यांच्या प्रकारांची ओळख करून दिली, तर राजेंद्र नेरे यांनी मुख्याध्यापक यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली व पदभार सांभाळताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती सांगितली. त्यासोबत योग्य वेळी योग्य निर्णय घेण्या संदर्भात सर्व प्रशिक्षण घेणाऱ्यांना केस स्टडी संदर्भात प्रश्नावली तयार करून देण्यात आली.
डॉ भारती हजारी यांनी आजच्या परिस्थितीत विद्यार्थी कसे सांभाळावे यासंदर्भात योग्य माहिती सांगितली. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या मुख्याध्यापक व शिक्षक यांनी उत्तम प्रतिसाद दिला. प्रशिक्षणासाठी सहभागी असलेल्या मुख्याध्यापक व शिक्षक यांनी आपल्या मनोगतात त्यांना या प्रशिक्षणातून काय घेतां आलं हे सांगितले. डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता ताई बिडकर यांनी मुख्याध्यापकांच्या अडचणी दूर करण्यासाठी संस्था नेहमी सहकार्य करत राहिलं असं सांगितलं.
या प्रशिक्षणासाठी ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण येथील प्राथमिक मुख्याध्यापिका छाया पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक संदिप कुमावत, अधिक्षक जोरीसर, सुधीर जगदाळे, हेमंत भामरे, अपर्णा गणाचार्य, तुषार ह्याळीज, प्रशांत थोरात, हरिश्चंद्र मोरे, कैलास कुवर, वसंत डोंगरे, श्रीम.निकुंभ, श्रीम.निलिमा पवार, श्रीम.ठाकरे, सतीश राऊत व इतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक भानुदास गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक संदिप कुमावत यांनी केले.
Comments
Post a Comment