चांदवडला रंगणार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा


नाशिक येथील अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने 11 एप्रिलला कार्यक्रमाचे आयोजन

चांदवड : धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक चांदवड आयोजित हिंदुस्थानचे युगपुरुष श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा 2024 या कार्यक्रमाचे आयोजन चांदवड येथील रंगमहाल( होळकर वाडा )येथे 11 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सेवा समितीचे आयोजक व प्रहारचे जिल्हा चिटणीस समाधान बागल यांनी दिली. 
चांदवड येथील रंगमहल अहिल्यादेवी होळकर वाडा आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्याचे शिलेदार महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, सोलापूर, येथील  संस्थानिक येत आहेत होळकर संस्थानचे सोळावे वंशज श्रीमंत महाराजा युवराज यशवंतराव शिवाजीराव होळकर, मध्य प्रदेशातील धार मालटण गादीचे श्रीमंत महाराजा उदयसिंग पवार, सुरगाणा संस्थानचे श्रीमंत महाराजा रोहितराजे पवार, तळोदा संस्थानचे श्रीमंत अमरजितराजे बारगळ(जहागिरदार), देवास मालटण गादीचे श्रीमंत महाराजा विक्रमसिंग पवार, होनाजी बलकवडे घराण्याचे वंशज श्रीमंत पांडुरंग बलकवडे यांच्यासह हिंदुस्थानातील स्वराज्याचे शिलेदार राजघराणे व सरदार घराण्याचे वंशज आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात विशेषतः साहित्य जगतात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना मल्हारश्री विशेष सन्मान हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये लोकनेते ओमप्रकाश बच्चभाऊ कडू, समाजसेवक राजाभाऊ वाजे, होळकरशाहीचे व्याख्याते लक्ष्मण नजन सर, प्रा. डॉ. यशपाल भिंगे, इतिहासकार प्रा. डॉ. मधुकर सलगरे, होळकरशाहीचे अहिल्यादेवी चित्रपट निर्माते सुशांत सोनवणे, होळकरशाहीचे अभ्यासक उज्ज्वलकुमार माने, जनतेचे सरदार गणेशभाऊ निंबाळकर, समाजसेवक,मच्छिंद्र भाऊ बिडगर आदी मान्यवरांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला