Posts

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याचे आवाहन

Image
मुंबई, दि. 27 : सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वाहनांना ही नोंदणी क्रमांकाची पाटी असणे बंधनकारक असणार आहे. तसेच 1 एप्रिल 2019 नंतर खरेदी केलेल्या वाहनांवर उत्पादकामार्फत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्यात आल्यामुळे अशा वाहनधारकांना पुन्हा ही नंबर प्लेट लावण्याची आवश्यकता नाही. नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे, नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड व बनावटगिरी रोखणे, वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणे, यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट महत्वाची आहे. तरी सर्व संबंधीत वाहनमालकांनी ही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या https://transport.maharasht...

नाशिकमधून ऑलिम्पियन घडण्याच्या दृष्टीने स्पर्धा महत्त्वपूर्ण - ॲड. नितीन ठाकरे

Image
राज्य धनुर्विद्या स्पर्धेचा समारोप : नाशिकच्या वैष्णवी, सृष्टी, साक्षी, तनुश्री, अर्षिता व अंकुरला सुवर्णपदक नाशिक :- जिल्ह्यात खेळ आणि खेळाडू वाढीसह गुणवंत व दर्जेदार खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा होणे अत्यंत गरजेचे आहे. एखादा ऑलिम्पियन घडण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. भविष्यात नाशिकमधून ऑलिम्पियन घडविण्याच्या दृष्टीने या स्पर्धा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत आयोजन समितीचे अध्यक्ष तथा मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले.  महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना आणि नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटना यांच्या वतीने नाशिकमध्ये सुरु असलेल्या २३ व्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे कोषाध्यक्ष रंगराव साळुंखे, कार्यकारिणी सदस्य अभिजीत दळवी, प्रवीण गडदे, स्पर्धा संचालक प्रवीण सावंत, नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील...

गाडी चालविताना मोबाइलचा वापर करू नका

मविप्र विधी महाविद्यालयातर्फे वाहतूक नियमांचा जागर नाशिक :- ‘गाडी चालविताना मोबाइलचा वापर करू नका..., हेल्मेट-सीट्बेल्टचा अवश्य वापर करा, जिथे असेल शाळा, तिथे वेगमर्यादा पाळा..,असे सूचनाफलक हाती घेऊन मविप्र विधी महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी शहरातील विविध सिग्नल्सवर थांबून वाहतूक नियमांचा जागर केला. मविप्र विधी महाविद्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि नाशिक शहर वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील विधी सहाय्य विभागाने स्वयंसेवकांच्या माध्यमातून शहरामधील विविध सिग्नल्स परिसरात रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली. यावेळी स्वयंसेवकांनी फलकांद्वारे व प्रत्यक्ष वाहनचालकांना सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक नियम कसे महत्वाचे आहेत, हे समजावून सांगितले. यावेळी वाहनधारकांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहनही करण्यात आले. हेल्मेट वापरा, सिग्नल पाळा, सीट बेल्ट नियमित लावा, गाडी चालवताना मोबाइलचा वापर करू नका आदी घोषणा असलेले फलक हाती घेऊन वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमा...