के.टी.एच.एम. महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाचा आजी- माजी शिक्षक व विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

नाशिक :- मविप्र संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आजी- माजी शिक्षक व विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ आर. डी. दरेकर सर उपस्थित होते, तर प्रमुख अतीथी म्हणून केटीएचएम महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एन आर भदाणे आणि वनस्पती शास्त्र विभागाचे प्रथम विभागप्रमुख डॉ. सी आर पाटील उपस्थित होते . प्रसंगी इतर मान्यवर शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बोरसे सर, माजी वनस्पती विभाग प्रमुख प्रा. डी आर महाजन, प्रा. पी पी अहिरे, प्रा. देवरे सर, प्रा. एम व्ही माळी, प्राचार्य डॉ. के एन गायकवाड, प्रा. बी डी भोकनळ, डॉ. एस आय पटेल उपस्थित होते.  
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. एम खालकर यांनी सांगितले की, केटीएच्एम महाविद्यालयाला ५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यात १९८२ सालापासून वनस्पती शास्त्र विभागाची स्थापना झाली आहे. वनस्पती शास्त्र विभाग मानवाच्या जीवनाशी निगडित आहे.आत्तापर्यंत या विभागातून ११८० विद्यार्थी हे पदवी तर ५४२ विद्यार्थी एम एस सी झाले आहेत. २५ विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे, आणि ४५ विद्यार्थी पीएचडी करीत आहेत. ५०० पेक्षा अधिक रिसर्च पेपर आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित झालेले आहेत. 
बहुजन हिताय बहुजन सुखाय या उद्देशाने मवीप्र संस्थेच्या समाज धुरीनांनी शिक्षणाची द्वारे बहुजन वर्गासाठी खुली केली. त्यांनी लावलेले रोपटे आज एका मोठ्या वटवृक्षांमध्ये पसरले आहे. वनस्पती शास्त्रातील विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात तसेच कृषी क्षेत्रातही काम केलेले आहे त्यांनी केलेल्या कामाचा निश्चितच उपयोग पुढील पिढीलाही संशोधनासाठी होईल असे मत माजी प्राचार्य डॉ एन आर भदाणे यांनी व्यक्त केले. 
 प्राचार्य डॉ.आर डी दरेकर यांनी सांगितले कि, नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक ज्ञानावर भर दिला आहे.आपल्या महाविद्यालयातील वनस्पती शास्त्रातील माजी विद्यार्थी हे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्या विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांना सहकार्य मार्गदर्शन करावे. त्यांच्या ज्ञानाचा निश्चितच उपयोग हा नवीन विद्यार्थ्यांना होईल. माजी विद्यार्थी हे महाविद्यालयाचे आधारस्तंभ आहेत. यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांचा एकमेकांशी ही संवाद साधला जातो आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.  
माजी विद्यार्थ्यांचे आजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे या हेतूने या मेळाव्याचे आयोजन केले आहे ,तसेच या सर्वांना एकत्रित आणून त्यांचा व्हाट्सअप ग्रुपही तयार करण्यात येईल जेणेकरून विद्यार्थ्यांना जर काही शैक्षणिक अडचण आल्यास ती दूर करता येईल, असे प्रास्ताविकात प्रा.आर के पाटील यांनी सांगितले.
काळानुरूप होणारा बदल शिक्षण आणि विविध क्षेत्रात स्वीकारणे आणि पुढे जाणे हे जीवनात महत्त्वाचे असल्याचे माजी प्रा.पी पी आहिरे यांनी सांगितले.
कार्याक्रमासाठी विभागाचे १९८२ पासून २०२२ पर्यंतचे माजी विध्यार्थी प्रातिनिधिक उपस्थित होते. त्यात सध्या न्यायाधीश असलेले दिलीप घुमरे , प्रा. डी. एम जाधव, माजी उपमहापौर विधिज्ञ मनीष बस्ते, श्री व सौ. सोमवंशी,  अजित रकिबे, ललित पाटील, प्रा. दर्शन कोकाटे, प्रा. रमाकांत पाटील, बृहद मुंबई कॉर्पोरेशनचे योगेन्द्रशिंग कच्छवा, बृहद मुंबई कॉर्पोरेशनच्या श्रीमती प्रतिभा ठाकरे, विख्यात वक्ते  अमोल चिने आणि इतर सर्व माजी विध्यार्थी उपस्थित होते. या वेळी विभागाचे माजी विध्यार्थी आणि सध्या न्यायाधीश असलेले दिलीप घुमरे यांनी त्यांचा विभागाप्रती असलेला जिव्हाळा प्रकट केला आणि आपल्या जुन्या आठवणी सांगतानाच नवीन विध्यार्थ्यांना समाजसेवा करण्याचा सल्लाही दिला.
माजी विध्यार्थी म्हणून मत व्यक्त करताना माजी उपमहापौर ॲड. मनीष बस्ते यांनी सांगितले कि, महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागात शिकत असताना मला लोकांमध्ये मिसळायला शिकवले. आज मी जो काही आहे ती या महाविद्यालयाची देन आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी विद्यार्थी  अमोल चिने, श्रीमती अंजली आहेर, डॉ. दर्शन कोकाटे, डॉ. स्वप्निल वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ.किरण गायकवाड, डॉ. सुचेता बिडवे, प्रा. स्मिता शिंदे, डॉ शहाजिन खान, निशा रायते,  विनोद ठोंबरे, देवयानी नेरकर,  शेखर शिंदे, तर विभागातील शिक्षकेतर  संगमनेरे,  थेटे,  आहेर,कळमकर यांनी परिश्रम घेतले. वनस्पतीशास्त्र विभागातील एम एस्सी भाग २ व टी. वाय बी एस्सी च्या विध्यार्थ्यानी कार्यक्रम यशस्वितेसाठी विशेष मेहनत घेतली. यावेळी सूत्रसंचालन डॉ. सोनाली देवरे तर डॉ. ज्ञानेश्वर खांडबहाले यांनी आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला